तरुण भारत

टॅक्सी मालकांना 14 पर्यंत मुदतवाढ

आझाद मैदानावर आंदोलन सुरच

प्रतिनिधी / पणजी

Advertisements

गेल्या कित्येक दिवसांपासून येथील आझाद मैदानावर सुरु असलेल्या टॅक्सी मालकांच्या धरणे आंदोलनाला मुदतवाढ मिळाली असल्याचे टॅक्सी मालकांचे आंदोलन सुरु रहाणार आहे. मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरुच रहाणार आहे या मुद्यावर टॅक्सी मालक ठाम असून आता त्यांना मुदत वाढही मिळाली आहे.

आझाद मैदानावर धरणे आंदोलन करण्यासाठी टॅक्सी मालकांनी जिल्हाधिकाऱयांकडून परवाना घेतला होता नंतर परवान्याची मुदत संपल्यानंतर टॅक्सीमालकांनी पुन्हा अर्ज दाखल केला होता. आज त्यांना मुदतवाढ मिळाली असून आंदोलन सुरुच रहाणार आहे. सरकारचे अटी नियम मान्य करण्यासाठी आम्ही बोलणी करायला तयार आहे मात्र अगोदर गोवा माईल्स रद्द करा या मतावर टॅक्सी मालक ठाम आहे असे टॅक्सी मालकांनी सांगितले. अनेक राजकीय पक्षनेते तसेच बिगर सरकारी संस्थेचे पदाधिकारी आम्हाला भेटून पाठींबा असल्याचे जाहिर करतात तसेच आपल मतही माणतात. आमच्या आंदोलनाची दारे सर्वांना उघडी असून टॅक्सी मालक आपल्या मतावर ठाम आहे. राज्यात वाहतूक व्यवसाय करणारे बस, टेंम्पो व इतर वाहतूक व्यवसाय करणाऱयांना सहकार्य करण्याचे आम्ही आवाहन करणार आहोत असे बाप्पा कोरगावकर यांनी सांगिते. उद्यापासून या आंदोलनाच मोठय़ासंखेने लोक येतील असेही कोरगावकर यांनी सांगितले.

Related Stories

मार्केटमध्ये अतिक्रमण करणाऱया व्यापाऱयांचे परवाने रद्द करण्याचा मुरगाव पालिकेचा ईशारा

Patil_p

जिल्हास्तरीय रोलर स्केटींग स्पर्धा उत्साहात

Amit Kulkarni

तळपण पुलाजवळ कारला अपघात

Amit Kulkarni

राज्यात पुन्हा एकदा मुसळधार पाऊस

Patil_p

सप्टेंबर महिन्यात सासष्टीत कोरोनाचे 21 बळी

Patil_p

उसगांव पंचायतीतर्फे लॉकडाऊनला उत्तम प्रतिसाद

Amit Kulkarni
error: Content is protected !!