तरुण भारत

पणजीतील बेकायदा दुसरा मजला पाडण्याचे काम सुरु

12 वर्षानंतर न्यालयात मनपाच्या बाजूने निकाल

प्रतिनिधी / पणजी

Advertisements

राजधानी पणजीतील ‘ट्रेडंस’ शोरुमचा दुसरा मजला (बांधकाम) बेकायदा ठरवून पाडण्याचे काम पणजी महापालिकेने सुरु केले असून त्यासाठी 10 दिवस लागतील आणि रु. 10 लाख खर्च येणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.

ताहीर विरानी यांच्या मालकीच्या या इमारतीत दुसरा मजला बेकायदेशीरपणे बांधण्यात आला होता. त्याला पणजी मनपाने आक्षेप घेतला होता आणि तो पाडण्याची नोटीस (आदेश) काही वर्षांपूर्वी जारी केली होती. पणजी मनपाच्या त्या आदेशास विरानी यांनी नगरविकास मंत्र्यांकडे आव्हान देऊन दाद मागितली आणि कशी बशी स्थगिती मिळवली. त्यानंतर हे प्रकरण पणजी मनपाने मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात नेऊन स्थगितीला आव्हान दिले. सदर न्यायालयाने स्थगिती फेटाळून लावली आणि बेकायदेशीर मजला तोडण्याचे निर्देश पणजी मनपाला दिले. त्या निकालास विरानी यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले. तिथेही त्यांचे आव्हान टिकू शकले नाही. त्या न्यायालयानेही उच्च न्यायालयाचा निकाल योग्य ठरवून सदर मजला पाडण्याचा निर्णय दिला. जवळजवळ गेली 12 वर्षे हे प्रकरण न्यायालयात चालू होते. त्याचा एकदाचा सोक्षमोक्ष लागला आणि पणजी मनपाने ते पाण्याचे ठरवून पालिका आयुक्त संजित रॉड्रिग्स यांनी तशी नोटीस विरानी यांना दिली. त्यांनी ते स्वतः पाडावे नाहीतर पणजी मनपाला ते पाडावे लागेल व त्याचा खर्च वसूल करावा लागेल, असेही त्यांना सांगण्यात आले आणि काही दिवसांची मुदतही देण्यात आली. परंतु त्या मुदतीत त्यांनी काहीच केले नसल्याने शेवटी ते बांधकाम पाडण्याची कारवाई पणजी मनपाला सुरु करावी लागली. मनपाचे इंजिनियर विवेक पार्सेकर यांच्या नेतृत्वाखाली कारवाई चालू झाली आहे. त्यासाठी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

Related Stories

गोव्यातील जमिनी परप्रांतिय खरेदीवर करण्यास बंदी आणणार कायदा असणे गरजेचे

Patil_p

रविवारी कोरोनाचे दोन बळी

Omkar B

विविध ठिकाणी माटोळी बाजारात खरेदीसाठी गर्दी

Patil_p

संस्कृती रक्षणासाठी भासुमंच्या आंदोलनामध्ये सहभागी व्हा

Amit Kulkarni

अभिनेत्री वर्षा उसगावकर यांना पितृशोक

pradnya p

पेडणे सार्व. गणेशोत्सव मंडळाचे विसर्जन

Patil_p
error: Content is protected !!