तरुण भारत

विधानसभा निवडणूक स्वबळावर लढविणार

दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांची माहिती

प्रतिनिधी / पणजी

Advertisements

आगामी 2022 च्या गोवा विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्ष 40 ही मतदारसंघातून स्वबळावर निवडणूक लढविणार आहे. या निवडणुकीत पक्षाला बहुमत मिळून पक्ष सत्तेवर येईल, असा ठाम विश्वास आहे. अनेकजण आपमध्ये प्रवेश करण्यास उत्सुक असून हे चांगले संकेत आहेत, असे मत आपचे नेते व दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांनी काल सोमवारी पणजीत आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत व्यक्त केले.

 गोव्यातील लोक आता ‘केजरीवाल मॉडेल ऑफ गव्हर्नन्स’कडे आशेने पाहत आहेत. लोक भाजप आणि काँग्रेसच्या पोकळ आश्वासनांना कंटाळले असून नवा विश्वासू राजकीय पर्याय शोधत आहेत. आपला स्व. पर्रीकरांचे गोव्याच्या विकासाचे व्हिजन पुढे नेण्याची इच्छा आहे. गोव्याच्या विकासासाठीचे भाऊसाहेब बांदोडकर आणि पर्रीकर यांनी पाहिलेले स्वप्न काँग्रेस व भाजपाने मातीत गाडले. म्हणून गोव्याला बदल देण्यासाठी आगामी विधानसभा निवडणुकीत आपचे 40 उमेदवार उभे राहणार असून यात 40 जागा निवडून येतील, असा विश्वास सिसोदिया यांनी यावेळी व्यक्त केला. 

गोव्यातील लोकांना बदल हवाय

मागील काही वर्षात गोमंतकीयांकडे सक्षम राजकीय पर्याय नव्हता. परंतु आज लोक आम आदमी पक्षाकडे एक प्रामाणिक आणि पारदर्शक राजकीय पर्याय म्हणून पाहतात. ज्याप्रकारे आम आदमी पक्षात सामान्यांचा युवकांचा, महिलांचा सहभाग वाढत आहे त्यावरून आप पक्ष एक आशेचा किरण गोमंतकीयांसाठी ठरत आहे. मागील पाच सहा महिन्यात राज्यातील विविध भागातील लोक पक्षात कार्यकर्ता म्हणून सामील होत आहेत. यावरून गोव्यातील लोकांना बदल हवा आहे, आपचा विस्तार हवा आहे.

भाऊसाहेब, पर्रीकरांचा गोवा पुन्हा अवतरेल

गोव्याचे पहिले मुख्यमंत्री भाऊसाहेब बांदोडकर यांनी गोव्यात शिक्षणाचा पाया उभारला. मात्र काँग्रेस आणि भाजपने हा पाया कमकुवत केला. त्याचप्रमाणे पर्रीकरांच्या निधनानंतर भाजपने पर्रीकरांनी उभारलेल्या विकासाचा पाया कमकुवत केला. पर्रीकरांनी गोव्याच्या विकासाचे पाहिलेले स्वप्न भाजपाने संपविण्याचा घाट घातला आहे. ज्यांना पर्रीकरांच्या विकसित गोव्याच्या दृष्टीकोनात विश्वास वाटतो त्यांनी आम आदमी पक्षासोबत यावे. कारण आप पक्ष हा दिल्लीत जसा बदल घडविला तसा गोव्यामध्ये बदल घडवून आणू शकतो, जो व्यक्ती भ्रष्टाचारी, वाईट चारित्र्याचा असेल किंवा गुन्हेगारी पार्श्वभूमीचा असेल त्याला पक्षात स्वीकारले जाणार नाही, असे सिसोदिया यांनी यावेळी सांगितले.

 उममुख्यमंत्री सिसोदिया हे रविवारपासून गोव्यात आहेत. काल सकाळी त्यांनी मिरामार येथील गोव्याचे पहिले मुख्य़मंत्री भाऊसाहेब बांदोडकर तसेच माजी मुख्य़मंत्री मनोहर पर्रीकर यांच्या स्मृतीस्थळी जाऊन श्रद्धांजली वाहिली.

Related Stories

आमदार कार्लुस आल्मेदा यांनी रेलमार्ग दुपदरीकरणासंबंधी सात वर्षांपूर्वी उपस्थित केले होते प्रश्न

Patil_p

लॉकडाऊन कालावधीत वाढ अत्यावश्यक

Omkar B

बार्देशातील पालक शिक्षकांचा विद्यालये, कॉलेज सुरू करण्यास विरोध

Omkar B

दहा रुपायांसाठी 50 हजारांना लुबाडले

Patil_p

अपघातग्रस्तांच्या कुटुंबाला मदत योजनेचा लाभ जनतेने घ्यावा

Patil_p

अस्नोडा येथे आमवृक्ष कोसळून रस्ता खोळंबला

tarunbharat
error: Content is protected !!