तरुण भारत

राज्यपाल, मुख्यमंत्र्यांकडून गुढीपाडव्याच्या शुभेच्छा

पणजी / स.प.

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी गुढीपाडव्यानिमित्त गोव्यातील जनतेस मनःपूर्वक आणि हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.

Advertisements

राज्यपाल आपल्या संदेशात म्हणतात, आपल्या देशात असंख्य उत्सवांचा समृद्ध वारसा असून ते उत्साह, धार्मिक आणि भक्तिभावाने साजरे केले जातात. हे सण एकजूट आणि समरसतेच्या भावनांना बळकट करताना विविधतेच्या ऐक्मयाच्या तत्त्वाशी असलेल्या आमच्या बांधिलकीची पुष्टी करतात. हे तीन सण भारतातील विविध भागांतील लोक साजरे करतात, पण हे सर्व पारंपारिक नवीन वर्षाची आणि कापणीच्या हंगामाची प्रतीक आहेत. यावषी हे उत्सव सुरक्षा शिष्टाचाराचे पालन करून साजरे करूया आणि गुढी पाडवा, विषू आणि बैसाखीचा उत्सव सर्वांना अधिक शांती, समृद्धी आणि आनंद घेऊन येवो, असे राज्यपाल म्हणतात.

 मुख्यमंत्री आपल्या संदेशात म्हणतात, हिंदु दिनदर्शिकेनुसार नवीन वर्षाची सुरुवात म्हणून चैत्र महिन्याच्या पहिल्या दिवशी गुढीपाडवा सण साजरा केला जातो. हा सण प्रत्येकासाठी आनंद आणि समृद्धीचे पर्व घेऊन येणारा सण म्हणून ओळखला जातो. गुढी पाडव्याच्या शुभप्रसंगी आपली स्वप्ने, आशा-अपेक्षा आणि आनंदाची नवीन सुरुवात होवो, अशी मी प्रार्थना करतो. हे नवीन वर्ष आपल्या प्रत्येकासाठी यश, आनंद आणि सर्वोत्तम आरोग्य घेऊन येवो.

Related Stories

भेटण्यासाठी बोलावूनही पर्यटन संचालक जीवरक्षकांना ठेवले तिष्ठत

Patil_p

कोरोना रुग्ण बरे होण्याच्या प्रमाणात वाढ

Omkar B

समाज कल्याण खत्यातर्फे देण्यात येणाऱया योजनेची रक्कम काही दिवसात मिळणार

Omkar B

पूर्ण अधिकार अन् वाढीव निधीही देणार

Patil_p

हर्षद मोदी यांच्या बांबोळी येथील भूखंड प्रकरणात भ्रष्टाचार

Patil_p

बायंगिणी कचरा प्रकल्पासाठी पर्यावरण मंडळाचा नाहक दाखला मंजूर

Patil_p
error: Content is protected !!