तरुण भारत

नववी, अकारावीच्या ऑनलाईन परीक्षेला मुख्याध्यापकांचा विरोध

प्रतिनिधी / पणजी

कोविडमुळे नववी आणि अकरावीच्या परीक्षा ऑनलाईनद्वारे घेण्याच्या सरकारच्या आदेशाला राज्यातील मुख्याध्यापक संघटनेने विरोध दर्शविला असून त्यासंदर्भात शिक्षकांचे एक शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांना भेटून आल्यानंतर पुन्हा एकदा शिक्षण संचालकांना देखील भेटून आले. परंतु सरकार आपल्या निर्णयाशी ठाम राहिले आहे.

Advertisements

दिवसेंदिवस कोविड बाधितांची संख्या वाढत असल्याने सरकारने कोणताही धोका स्वीकारु नये याकरिता सध्या तरी नववी आणि अकरावीच्या परीक्षा ऑनलाईनद्वारे घेण्याचा आदेश गेल्याच आठवडय़ात जारी केला होता. मात्र निर्णयाचे विपरित परिणाम विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासावर होईल अशी भीती काही शिक्षकांकडून व्यक्त करण्यात आली. या संदर्भात राज्यातील मुख्याध्यापक संघटनेने काही दिवसांपूवी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची भेट घेतली आणि सदर निर्णय रद्द करावा अशी जोरदार मागणी केली. मात्र मुख्यमंत्र्यांकडून समाधानकारक उत्तर आले नाही.

काल सोमवारी शिक्षक संघटनेची पुन्हा एकदा बैठक झाली आणि शिष्टमंडळाने शिक्षण संचालक श्री. भगत यांची भेट घेतली आणि निर्णयात बदल करावा, अशी मागणी केली. मात्र भगत यांनी सरकारचा निर्णय सरकारने परिपत्रकाद्वारे कळविलेला आहे त्यानुसार अनेक शैक्षणिक संस्थाने ऑनलाईन परीक्षा सुरु केलेली आहे. त्यामुळे आता निर्णयात बदल करणे शक्य होणार नाही, असे स्पष्ट केले.

… अपेक्षा 100 टक्के निकालाची

उपलब्ध माहितीनुसार, राज्यातील काही शैक्षणिक संस्थांना आपल्या शाळा व उच्च माध्यमिक विद्यालयांचे निकाल 100 टक्के आलेले हवे आहेत. ऑनलाईन परीक्षा घेतल्यास नववी व अकरावीचे बहुतेक सर्व विद्यार्थी 100 टक्के उत्तीर्ण होतील आणि दहावी व बारावीच्या निकालावेळी त्यातील काही विद्यार्थी अनुतीर्ण ठरले, तर शाळेचा निकाल 100 टक्के लागणार नाही या भीतीपोटी काही शिक्षकांनी सरकारच्या परिपत्रकास विरोध केला आहे. त्यामुळे या शाळांची नववी व अकरावीच्या परीक्षा होणे शिल्लक आहे, तेथील विद्यार्थ्यांना अद्याप कोणता निर्णय होईल हे कळणे मुश्किल झाले आहे.

Related Stories

मोपा पीडित शेतकऱयांची 18 रोजी उपजिल्हाधिकारी कार्यलयात बैठक

Amit Kulkarni

पतसंस्था बंद असल्याने सुमारे पाच लाख खातेदारांना फटका

Omkar B

आदर्श कृषि खरेदी-विक्री संस्थेच्या फोंडा व वाळपई शाखेचे 24 रोजी उद्घाटन

Amit Kulkarni

सरकारने नीट आणि जेईईच्या परीक्षा पुढे ढकलाव्यात एनएसयूआयची मागणी

GAURESH SATTARKAR

पिसुर्ले भागातील खनिज मालाची वाहतूक बेकायदेशीर 26 ट्रक, काँन्ट्रक्टर विरोधात वाळपई पोलीस ठाण्यात तक्रार दाखल

Omkar B

आडपई गावातील परिस्थितीचा आयुषमंत्र्यांनी घेतला आढावा

Omkar B
error: Content is protected !!