तरुण भारत

दिल्लीत कोरोनाचा उद्रेक : एका दिवसात 11,491 नवे रुग्ण;72 मृत्यू

  • कोरोना बाधितांनी ओलांडला 7.36 लाखांचा टप्पा 


ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : 


राजधानी दिल्लीत पुन्हा एकदा कोरोनाने डोके वर केले आहे. सोमवारी तब्बल 11 हजारपेक्षा अधिक रुग्ण आढळून आले. त्यामुळे राजधानीत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, मागील 24 तासात 11 हजार 491 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. तर 72 जणांचा मृत्यू झाला आहे. 

Advertisements


आरोग्य विभागाकडून मिळालेल्या ताज्या आकडेवारी नुसार, मागील 24 तासात 7,665 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यामुळे दिल्लीतील कोरोना बाधितांची एकूण संख्या 7 लाख 36 हजार 688 वर पोहचली आहे. तर आतापर्यंत 6 लाख 87 हजार 238 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर आतापर्यंत 11,355 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मृत्यू दराचे प्रमाण 1.54 % इतके आहे. सद्य स्थितीत 38,095 रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 


दिल्लीत आतापर्यंत जवळपास 1 कोटी 56 लाख 50 हजार 640 टेस्ट करण्यात आल्या आहेत. त्यातील 65,564 आरटीपीसीआर टेस्ट आणि 26,833 रैपिड एंटिजेन टेस्ट काल एका दिवसात करण्यात आल्या आहेत. सद्य स्थितीत कोरोना संसर्गाचे प्रमाण 12.44 % आहे. तर 6,175 झोन आणि 1,265 कंट्रोल रूम आहे.

Related Stories

गुगल मॅप दाखविणार ‘हरित मार्ग’

Patil_p

दिल्ली : गेल्या 24 तासात 1299 नवे कोरोना रुग्ण; 15 मृत्यू

pradnya p

अनोखी लग्नपत्रिका, अहेराचा दिला पर्याय

Patil_p

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंजाब सरकारने घेतला ‘हा’ निर्णय

pradnya p

मंगळूर विमानतळावर स्फोटके लावल्याप्रकरणी आदित्यराव विरोधात आरोपपत्र दाखल

Rohan_P

आधुनिक रायफलींसाठी भारताचा रशियासोबत करार

datta jadhav
error: Content is protected !!