तरुण भारत

पथदीप बसविले, मातीचे ढिगारे जैसे थे

रस्त्याशेजारी पार्किंगला अडथळा : मातीचे ढिगारे हटवून रस्ता मोकळा करण्याची मागणी

प्रतिनिधी / बेळगाव

Advertisements

शहरात स्मार्ट सिटी योजनेंतर्गत नवीन पथदीप उभारण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. प्रत्येक गल्लीमध्ये नवीन विद्युत वाहिन्या घालून पथदीप बसविण्यासाठी खोदाई करण्यात आली आहे. मात्र, त्या ठिकाणी साचलेली माती हटविण्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने वाहतुकीस आणि पार्किंगला अडथळा ठरत आहे.

संपूर्ण शहर स्मार्ट बनविण्याच्यादृष्टीने विविध कामे राबविण्यात येत आहेत.  विजेची बचत आणि प्रत्येक गल्लीत पथदीप बसविण्यासाठी स्मार्ट सिटी योजनेंतर्गत एलईडी पथदीप बसविण्याचा प्रस्ताव हाती घेतला आहे. या अंतर्गत शहर आणि उपनगरांतील प्रत्येक रस्त्यावर पथदीप बसविण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. याकरिता भूमिगत विद्युत वाहिन्या घालण्याचे कामदेखील युद्धपातळीवर सुरू आहे. पथदीप उभारण्यासाठी खड्डे खोदून फौंडेशन निर्माण करण्यात येत आहे. शहरातील बहुतांश गल्ल्यांमधील हे काम युद्धपातळीवर सुरू आहे. त्यामुळे सुस्थितीत असलेले रस्तेदेखील खड्डेमय बनले आहेत. पथदीप बसविण्यासाठी खोदण्यात आलेल्या खड्डय़ांतील माती पथदिपाच्या बाजूलाच ठेवण्यात आली आहे.

विद्युत वाहिन्या घालण्यात आल्या तरी चरी व्यवस्थित बुजविण्यात आल्या नाहीत. त्यामुळे रस्त्याच्या शेजारी मातीचे ढिगारे साचले आहेत. सदर काम पूर्ण झाल्यानंतर मातीचे ढिगारे हटविणे गरजेचे आहे. मात्र, बाजारपेठेसह अन्य रस्त्यांवरील मातीचे ढिगारे जैसे थे आहेत. त्यामुळे रस्त्याशेजारी पार्किंगला अडथळा ठरत आहे. रामदेव गल्ली, समादेवी गल्ली, गणपत गल्ली अशा अरुंद असलेल्या गल्ल्यांमधील मातीचे ढिगारे वाहतुकीस अडचणीचे बनले आहेत. सदर मातीचे ढिगारे हटविण्याकडे महापालिकेसह पथदीप बसविणाऱया कंत्राटदारांनी कानाडोळा केला आहे. त्यामुळे सदर मातीचे ढिगारे हटवून रस्ता मोकळा करावा, अशी मागणी होत आहे.

Related Stories

खमंग मिसळवर खवय्यांचा ताव

Patil_p

अथर्व सोलापूर संघाकडे एसएसके चषक

Amit Kulkarni

पंतनगर येथे माजी सैनिकाचे घर फोडले

Patil_p

शहराच्या मध्यवर्ती भागात सारे काही बंद

Patil_p

शुक्रवार ठरला ‘ब्लॅक फ्रायडे’ आणखी 11 रुग्णांची भर

Patil_p

शिक्षकांची शाळा उद्यापासून सुरू होणार

Patil_p
error: Content is protected !!