तरुण भारत

जिल्हय़ात 49 नवे रुग्ण तर 46 जण कोरोनामुक्त

कोरोना बळींचे सत्र सुरूच : 62 वषीय महिलेचा मृत्यू

प्रतिनिधी / बेळगाव

Advertisements

बेळगाव शहर व जिल्हय़ात कोरोना रुग्ण संख्येत झपाटय़ाने वाढ सुरूच आहे. सोमवारी 49 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून गेल्या 24 तासांत कोरोनामुक्त झालेल्या 46 जणांना घरी पाठविण्यात आले आहे. तर 62 वषीय एका महिलेचा मृत्यू झाला आहे.

जिल्हय़ातील एकूण बाधितांची संख्या 28 हजार 131 हून अधिक झाली आहे तर मृतांचा आकडा 351 वर पोहोचला असून आतापर्यंत 27 हजार 163 जणांनी कोरोनावर मात केली आहे. सक्रिय रुग्ण संख्या 584 वर असून त्यांच्यावर वेगवेगळय़ा इस्पितळांत उपचार करण्यात येत आहेत.

अद्याप 2 हजार 123 जणांचा अहवाल यायचा आहे तर 36 हजार 270 जण 14 दिवसांच्या होमकेअरमध्ये आहेत. गरज भासल्यास किंवा लक्षणे आढळून आल्यास त्यांचीही स्वॅब तपासणी करण्यात येणार आहे. आतापर्यंत 6 लाख 15 हजार 181 जणांची स्वॅब तपासणी करण्यात आली असून त्यापैकी 5 लाख 81 हजार 656 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.

गणेशपूर, भाग्यनगर, हनुमाननगर, विनायकनगर, भडकल गल्ली, खासबाग, चव्हाट गल्ली, खडेबाजार, मृत्युंजयनगर, रामतीर्थनगर, वडगाव, हनुमाननगर परिसरात पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. यामध्ये चार वर्षाचा बालक व 10 वर्षांच्या एका बालिकेचाही समावेश आहे. उगार खुर्द, कोचरी, कौजलगी, गोकाक, यरगट्टी, उडकेरी, अथणी, यकुंडी, मुरगोड, काडापूर, मेळवंकी, लोंढा, सुनदोळी, बाडगी येथेही कोरोना रुग्ण आढळून आले असून खानापूर पोलीस ट्रेनिंग सेंटरमधील दोघा जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

गेल्या आठवडय़ाभरात मृतांची संख्या वाढती आहे. चालू महिन्याअखेपर्यंत व मे महिन्यात रुग्ण संख्येत मोठय़ा प्रमाणात वाढ होणार आहे. त्यामुळे प्रत्येकांनी खबरदारी बाळगणे एकच पर्याय आहे. याबरोबरच लसीकरणाचा वेग वाढविण्यात आला आहे. एक लोकसभा व दोन विधानसभा मतदार संघातील पोटनिवडणुकीनंतर नियम आणखी कडक करण्यात येणार आहेत.

Related Stories

गनिमी काव्याने हदनाळमध्ये फडकवला भगवा!

Amit Kulkarni

माजी केंद्रीय मंत्री बाबागौडा पाटील यांचे निधन

Amit Kulkarni

सद्गुरु बाळूमामांचा भंडारा उत्सव साधेपणाने

Omkar B

आज बाल साहित्याचा जागर

Amit Kulkarni

प्रत्येक चित्रांमध्ये जाणवतोय जिवंतपणा!

Patil_p

‘गोल्डन व्हाईस ऑफ बेळगाव’ची अंतिम फेरी 7 नोव्हेंबर रोजी

Amit Kulkarni
error: Content is protected !!