तरुण भारत

ताशिलदार गल्लीतील गटारी तुंबल्या

सांडपाण्याचा निचरा होत नसल्याने समस्या : उपाययोजना राबविण्याची मागणी

प्रतिनिधी / बेळगाव

Advertisements

शहराची वाटचाल स्मार्ट सिटीकडे होत असून रस्त्यांचे काँक्रिटीकरण, गटारींचे बांधकाम आदी सुविधा करून देण्यावर भर देण्यात आला आहे. मात्र, शहरांतर्गत असलेल्या समस्यांकडे महापालिका आणि स्मार्ट सिटी कंपनीने कानाडोळा केला आहे. परिणामी ताशिलदार गल्लीतील गटारी सांडपाण्याने तुंबल्या आहेत. त्यामुळे या सांडपाण्याचा निचरा कधी आणि कसा होणार, अशी विचारणा नागरिकांतून होत आहे.

शहरातील समस्यांचे निवारण करण्यासाठी विविध उपाययोजना राबविण्याच्या नावाखाली कोटय़वधीचा निधी खर्च केला जातो. पण प्रत्यक्षात मात्र समस्या जैसे थे आहेत. ताशिलदार गल्ली तसेच भांदूर गल्ली परिसरातील कपिलेश्वर रोडवर उड्डाणपुलाची उभारणी केली. पण येथील सांडपाण्याचा निचरा होण्याच्यादृष्टीने कोणत्याच उपाययोजना राबविल्या नाहीत. त्यामुळे थोडासा पाऊस झाला की ताशिलदार गल्ली, भांदूर गल्ली परिसरात पाणी साचून राहते. येथील काही घरांमधून पाणी शिरते. येथील समस्यांचे निवारण करावे, अशी मागणी सातत्याने केली जाते. पण याकडे प्रशासनाने कानाडोळा केला आहे. अलीकडे तर येथील गटारीमधील सांडपाण्याचा निचराही व्यवस्थित होत नसल्याची बाब निदर्शनास आली आहे. सांडपाण्याचा निचरा होण्याच्यादृष्टीने कोणत्याच उपाययोजना राबविल्या नाहीत. या समस्यांबाबत येथील रहिवाशांनी महापालिकेकडे अनेकवेळा तक्रारी केल्या. पण याची दखल घेतली नाही. त्यामुळे गटारी तुडुंब भरून आहेत. गटारी साचून राहिल्याने परिसरात दुर्गंधी पसरली आहे. डासांचा उपद्रव वाढला असून रहिवाशांचे आरोग्य धोक्मयात आले आहे.

कायमस्वरुपी तोडग्यात अपयश

सांडपाण्याचा निचरा करण्यासाठी महापालिकेच्या अधिकाऱयांनी एक-दोन वेळा प्रयत्न केले. पण या समस्येवर कायमस्वरुपी तोडगा काढण्यास अपयशी ठरले आहे. परिणामी सांडपाण्याची समस्या जैसे थे आहे. या समस्येमुळे आरोग्याची समस्या निर्माण होत असून विविध रोगराईंचा सामना रहिवाशांना करावा लागत आहे. त्यामुळे महापालिकेच्या अधिकाऱयांनी पाहणी करून समस्यांचे निवारण करण्यासाठी आवश्यक उपाययोजना राबवाव्यात, अशी मागणी होत आहे.

Related Stories

कार्यकर्ता, धडाडीचा पत्रकार हरपला

Patil_p

अट्टल मोटार सायकल चोराला अटक

Patil_p

केंद्रिय अर्थमंत्रालयाच्या कर विभागाकडून सतीश जाधव यांचा गौरव

Patil_p

कॅन्टोमेंट सुरू करणार बाल संगोपन केंद्र

Patil_p

दैवज्ञ सुवर्णकार व्यावसायिक संघ शहापूरवतीने गरजूंना साहित्य

Patil_p

शिक्षकांवर ताण वाढला

Patil_p
error: Content is protected !!