तरुण भारत

बससेवा ठप्पच … भिस्त खासगी वाहनांवर

संप कायम : प्रवाशांचे हाल,  परिवहनचे कर्मचारी मागण्यांवर ठाम, अधिक भाडे घेणाऱया वाहनधारकांवर कारवाईचा इशारा

प्रतिनिधी / बेळगाव

Advertisements

वेतनवाढीसह विविध मागण्यांसाठी परिवहन कर्मचाऱयांनी पुकारलेला संप अद्याप कायम आहे. प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून परिवहन मंडळाच्या काही मोजक्मया बसेस विविध मार्गांवर धावत आहेत. मात्र, अद्यापही प्रवाशांची भिस्त खासगी वाहनांवरच अवलंबून आहे. त्यामुळे प्रवाशांची ने-आण करण्यासाठी बसस्थानकात मिनी बस, मॅक्सी कॅब व रिक्षा दिसून येत आहेत. बसस्थानकात प्रवाशांची संख्या दिसून येत असली तरी बससेवा ठप्प आहे. त्यामुळे काही भागातील प्रवाशांचे अतोनात हाल होत आहेत. बस बंद असल्याने खासगी वाहनधारकांसाठी अच्छे दिन सुरू आहेत.

बससेवा ठप्प झाल्याने बसस्थानकातील प्रवाशांची वर्दळदेखील थंडावलेली आहे. सर्रास प्रवासी स्वतःच्या वाहनांचा वापर करत असल्याने प्रवाशांची संख्या रोडावली आहे. स्थानिक बसेसदेखील जागेवर थांबून असल्याने स्थानिक प्रवाशांची संख्या फारच कमी झाली आहे.

संपाचा तिढा अद्याप कायम

राज्य सरकारने कर्मचाऱयांनी मागणी केलेल्या सहाव्या वेतन आयोगाला यापूर्वीच नकार दर्शविला आहे. शासनाने केवळ वेतनवाढ देण्याचे मान्य केले होते. मात्र, कर्मचारी सहाव्या वेतनवाढीवर ठाम आहेत. त्यामुळे परिवहन कर्मचाऱयांच्या संपाचा तिढा अद्याप कायम आहे. बेळगाव बसस्थानकातून सोमवारी रामदुर्ग, धारवाड, काकती, रणकुंडये, खानापूर आदी भागांकडे मोजक्मयाच बसेस धावल्या. त्यामुळे प्रवाशांना खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागत आहे. बसस्थानकातून संकेश्वर, निपाणी, कोल्हापूर, खानापूर, चिकोडी, हत्तरगी, हुक्केरी आदी भागांकडे खासगी वाहने धावत आहेत. काही खासगी वाहनधारक प्रवाशांकडून जादा भाडे घेऊन लूट करत असल्याच्या तक्रारीदेखील वाढल्या आहेत. अधिक भाडे घेणाऱया वाहनधारकांवर कारवाईचा इशारा आरटीओ शिवानंद मगदूम यांनी दिला आहे.

गोवा राज्याची बससेवा सुरळीत

परिवहन कर्मचाऱयांनी संप पुकारला असला तरी गोवा राज्याची बससेवा सुरळीत सुरू आहे. कदंबा बस दररोज बेळगाव बसस्थानकात येऊन बससेवा पुरवत आहे. सोमवारी पणजी-बेळगाव व मडगाव-बेळगाव या दोन बस दाखल झाल्या होत्या. या बसना प्रवाशांचा प्रतिसाददेखील मिळत आहे. बेळगाव-पणजी बस चोर्ला, म्हापसा, साखळीमार्गे धावत आहे. बेळगाव-मडगाव बस अनमोड कुडची मार्गे धावत आहेत. त्यामुळे या मार्गावरील प्रवाशांना कर्नाटक परिवहनची बससेवा बंद असल्याने गोवा राज्याच्या बससेवेवर अवलंबून राहावे लागत आहे.

लोकसभा पोटनिवडणुकीच्या कामासाठी महाराष्ट्राची लाल परी

लोकसभा पोटनिवडणुकीची रणधुमाळी सुरू असून शनिवार दि. 17 रोजी निवडणूक होणार आहे. मात्र, सध्या परिवहनच्या कर्मचाऱयांनी संप पुकारल्याने अडचणी निर्माण झाल्या आहेत. शिवाय संप मागे न घेतल्यास निवडणुकीच्या कामासाठी महाराष्ट्र एसटी महामंडळाची मदत घेतली जाणार आहे. महाराष्ट एसटी महामंडळाने 500 बस देण्याची तयारी दर्शविली असल्याची माहिती जिल्हाधिकारी तसेच जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. के. हरिशकुमार यांनी दिली आहे.

महाराष्ट्र एसटी महामंडळाशी संपर्क

परिवहन कर्मचाऱयांच्या संपाचा परिणाम निवडणुकीवर होऊ नये, याकरिता निवडणूक आयोग प्रयत्नशील आहे. दरम्यान, कर्मचाऱयांनी संप मागे न घेतल्यास महाराष्ट्राच्या लालपरीची मदत घेतली जाणार आहे. दरम्यान, मतदान केंद्रांवर जाण्यासाठी कर्मचारी, इव्हीएम मशीन व इतर साहित्य नेण्यासाठी महाराष्ट्र महामंडळाच्या एसटीची मदत होणार आहे. याबाबत जिल्हाधिकाऱयांनी महाराष्ट्र एसटी महामंडळाशी संपर्क साधला असून त्यांनी होकार दर्शविला आहे.

Related Stories

गणेश ज्वेलर्स हुबळी टायगर्स, विश्रृत स्ट्रायकर्स विजयी

Patil_p

शेतकऱयांची जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक

Amit Kulkarni

ब्लॅक फंगस रुग्णांच्या वाढत्या संख्येने आरोग्य खात्यासमोर आव्हान

Amit Kulkarni

परराज्यातील नागरीकांना क्वारंटाईन करण्याचा ताण झाला कमी

Patil_p

कॅम्प परिसरात वाहतूक कोंडी

Amit Kulkarni

अंगणवाडी कर्मचाऱयांना आर्थिक मदत द्या

Amit Kulkarni
error: Content is protected !!