तरुण भारत

वडगाव परिसरातून शुभम शेळके यांना पाठिंबा

मोठे मताधिक्य मिळवून देण्याचा विविध मंडळांच्या कार्यकर्त्यांचा बैठकीत निर्धार

प्रतिनिधी / बेळगाव

Advertisements

वडगाव येथील विविध मंडळांकडून मध्यवर्ती म. ए. समितीचे उमेदवार शुभम शेळके यांना जाहीर पाठिंबा देण्यात आला आहे. धर्मवीर संभाजीनगर येथील गणेश मंदिर ट्रस्ट, पंच मंडळ, धर्मवीर संभाजी युवक मंडळ, गणेशोत्सव मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी झालेल्या बैठकीत शुभम शेळके यांना मोठे मताधिक्मय देण्याचा निर्णय घेण्यात आला.

या बैठकीला मारुती जायण्णाचे, भाऊराव पाटील, प्रदीप शट्टीबाचे, परशराम नावगेकर, नारायण केसरकर, श्रीधर जाधव, प्रसाद यळ्ळूरकर, विनायक मोरे, धोंडिबा मोहिते, अमित सैनुचे, महादेव मोरे, महेश लाड, परशराम बगाडे, गुरुनाथ पाटील, जयानंद कदम, चेतन केसरकर, राजू चव्हाण, विनायक अकणोजी, विनय पाटील, कौशिक जाधव, यल्लाप्पा लाड यांच्यासह इतर सदस्य उपस्थित
होते.

कारभार गल्ली वडगाव

कारभार गल्ली वडगाव येथील नरवीर शिवशक्ती युवक मंडळाच्यावतीने मध्यवर्ती म. ए. समितीचे उमेदवार शुभम शेळके यांना पाठिंबा जाहीर केला आहे. यावेळी बाळू जुवेकर, ज्ञानेश्वर मन्नूरकर, दिलीप नाईक, समित उंदरे, फकिरा कुंडेकर यांच्यासह उपस्थित होते.

कोनवाळ गल्ली सिंहगर्जना युवक मंडळाचा पाठिंबा

कोनवाळ गल्ली येथील सिंहगर्जना युवक मंडळाच्यावतीने मध्यवर्ती म. ए. समितीचे अधिकृत उमेदवार शुभम शेळके यांना जाहीर पाठिंबा देण्यात आला. मंडळाची महत्त्वपूर्ण बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीत शेळके यांना प्रचंड मतांनी निवडून आणण्याचा निर्धार करण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ट पंच रामा शिंदोळकर होते.

प्रारंभी अभिजीत सुणगार यांनी सर्वांचे स्वागत करून प्रास्ताविक केले. गल्लीतील सिंहगर्जना युवक मंडळ, महिला मंडळ, पंच मंडळ, ब्रम्हलिंग देवस्थान व समस्त नागरिकांचा पाठिंबा व्यक्त करण्यात आला. या बैठकीला कार्याध्यक्ष अभिजीत सुणगार, उपाध्यक्ष विनायक बेळगावकर, सेपेटरी नारायण एम., विश्वनाथ सूर्यवंशी, सुनील देसूरकर, युवराज चव्हाण, बळवंत शिंदोळकर, प्रसाद कुडतुरकर, अक्षय वाके, सूरज शिंदोळकर, दिनेश देसूरकर, चेतन जुटेकर, निखिल नाईक, गजानन पानकर, संजय देसूरकर, गुरुनाथ चांदेकर, उमेश लोहार, निखिल पानकर, गुरुनाथ होसूरकर, किरण गावडे, शशिकांत हावळ, आब गवंडी, अशोक शिंदे यांच्यासह युवक उपस्थित होते.

Related Stories

झफरखान सरवरची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड

Amit Kulkarni

ग्रामीण भागातील वस्तीची बससेवा विस्कळीत

Patil_p

ज्ञानेश्वरी हे भगवत्गीतेचे परिपूर्ण भाषांतर

Amit Kulkarni

जलवाहिन्यांमुळे सांडपाणी वाहण्यास अडथळा

Amit Kulkarni

ट्रेझरी कार्यालयातील कर्मचाऱयांना शिक्षक संघाने विचारला जाब

Amit Kulkarni

खत दरविरोधात शेतकऱयांचे आंदोलन

Amit Kulkarni
error: Content is protected !!