तरुण भारत

गटारी तुंबल्याने पावसाचे पाणी दुकानामध्ये

स्मार्ट सिटी कंपनीच्या अधिकाऱयांनी केली पाहणी : गटारीतील जल-विद्युत वाहिन्या हटविण्याकडे कानाडोळा

प्रतिनिधी / बेळगाव

Advertisements

शहरातील गटारी स्वच्छ करण्याकडे महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे. गटारीमधील जलवाहिन्या व विद्युत वाहिन्या हटविण्याकडे स्मार्ट सिटी कंपनीने कानाडोळा केला आहे. मात्र, पावसाच्या पाण्याचा निचरा गटारींमधून झाला नसल्याने याचा फटका नागरिकांना बसला आहे. शहापूर खडेबाजार येथील गटारींचे सांडपाणी दुकानात शिरल्याने पंधरा लाखांचे नुकसान झाल्याची तक्रार करण्यात आली आहे.

गटारी स्वच्छ केल्या जात नाहीत. स्मार्ट सिटी कंपनीच्या अर्धवट कामांचा नमुना वळीव पावसामुळे चव्हाटय़ावर आला आहे. रविवारी दुपारी झालेल्या जोरदार वाऱया-पावसामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले. गटारीमधील सांडपाण्याचा निचरा व्यवस्थित झाला नाही. ठिकठिकाणी गटारीमध्ये कचरा साचून राहिला आहे. काही ठिकाणी जलवाहिन्या, विद्युत वाहिन्या न हटविता स्मार्ट सिटी कंपनीने गटारीचे बांधकाम केले आहे. त्यामुळे विद्युत वाहिन्यांमध्ये कचरा अडकून राहिल्याने गटारींमधून सांडपाण्याचा निचरा झाला नाहे. परिणामी गटारीचे पाणी रस्त्यावरून वाहू लागले. शहापूर परिसरातील रस्त्यांची उंची वाढविण्यात आली असल्याने काही व्यावसायिकांच्या दुकानांमध्ये पाणी शिरत आहे. असाच प्रकार खडेबाजार शहापूर येथील श्रीमती साडी दुकानामध्ये घडला आहे. तळघरात असलेल्या दुकानामध्ये पाणी शिरल्याने मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे. पाणी शिरल्याने पंधरा लाखांहून अधिक किमतीचे कपडे खराब झाल्याचा दावा रमेश पन्हालाल खोडा यांनी केला आहे.

भाजी विपेत्यांना समज देण्याची गरज पावसाचे पाणी दुकानामध्ये शिरल्याची तक्रार स्मार्ट सिटी कंपनीच्या अधिकाऱयांकडे केली होती. याची दखल घेऊन अधिकाऱयांनी सोमवारी सकाळी खडेबाजार शहापूर परिसरात पाहणी केली. मीरापूर गल्लीच्या
कॉर्नरवर गटारीमध्ये कचरा अडकून राहिल्याचे निदर्शनास आले. कचेरी गल्ली कॉर्नरवर विद्युत वाहिन्या आणि जलवाहिन्यांमध्ये कचरा अडकल्याने सांडपाणी रस्त्यावरून वाहत असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे स्वच्छता कामगारांना तसेच कंत्राटदाराला बोलावून गटारीमधील कचरा हटविला. पण ही समस्या कायमच भेडसावण्याची शक्मयता आहे. त्यामुळे गटारीमधील विविध वाहिन्या हटविण्याची गरज असून गटारीमध्ये कचरा टाकणाऱया भाजी विपेत्यांना समज देण्याची गरज असल्याच्या प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केल्या. शहापूर येथील रस्ते कामासाठी खोदलेल्या व्यावसायिकांचे नुकसान झाले. आता रस्त्यांचे काम झाल्यानंतर पावसाचे पाणी व्यावसायिक आस्थापनांमध्ये शिरत असल्याने व्यावसायिकांना आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. त्यामुळे स्मार्ट सिटीच्या कामाबाबत नागरिक संताप व्यक्त करीत आहेत.

Related Stories

भाजपचा ग्रामीण भागात प्रचार

Amit Kulkarni

पेटीबंद उमेदवारांचे आज ठरणार भवितव्य

Patil_p

बेळगावातील 305 जणांचे अहवाल निगेटिव्ह

Rohan_P

बसवनकुडची येथे भरदिवसा 5 लाखांची घरफोडी

Patil_p

गुरूवारी कोरोना रुग्ण संख्येने पार केला 800 चा आकडा

Rohan_P

चौकशी झाली तरी स्वयंचलित (स्काडा) यंत्रणा बंदच

Patil_p
error: Content is protected !!