तरुण भारत

छत्रपती संभाजी महाराज बलिदान मासची सांगता

शहरातून काढण्यात आली मूक पदयात्रा : शिवप्रेमी-धारकऱयांचा सहभाग : विधिवत पूजनासह महाराजांना अभिवादन

प्रतिनिधी / बेळगाव

Advertisements

शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानतर्फे आयोजित बलिदान मास मागील एक महिन्यापासून आचरणात आणला. सोमवारी बलिदान मासची सांगता झाली. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांची न निघालेली अंत्ययात्रा मूक फेरीद्वारे शहरातून काढण्यात आली. यामध्ये शेकडोंच्या संख्येने शिवप्रेमी व धारकरी सहभागी झाले होते.

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांनी धर्मासाठी आपल्या प्राणाचे बलिदान दिले. हे धर्मासाठीचे बलिदान व्यर्थ जावू न देता आजच्या पिढीपर्यंत पोहोचण्यासाठी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानतर्फे बलिदान मासचे आयोजन करण्यात येते. यावषी फाल्गुन शुक्ल प्रतिपदा ते फाल्गुन अमावास्या (14 मार्च ते 12 एप्रिल) दरम्यान बलिदान मासचे आयोजन करण्यात आले होते. सोमवारी बलिदान मासची सांगता झाली.

सोमवारी पहाटे छत्रपती शिवाजी उद्यान येथे विधिवत पूजन करण्यात आले. यावषी पूजेचा मान उद्यानात मॉर्निंग वॉकसाठी येणाऱया नागरिकांना देण्यात आला. संभाजी सूर्यहृदय श्लोक म्हणून प्रेरणामंत्र म्हणण्यात आला. किरण गावडे यांच्या हस्ते आरती करण्यात आली. यानंतर सांगली येथून आणण्यात आलेल्या संभाजी ज्वालेचे पूजन करण्यात आले. तेथून संभाजी महाराजांची न निघालेली अंत्ययात्रा काढण्यात आली. कपिलेश्वर रोडमार्गे, हेमू कलानी चौक येथून धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चौकातील संभाजी महाराजांच्या मूर्तीसमोर ज्वाला शांत करण्यात आली.

छत्रे गुरुजी व त्यांच्या सहकाऱयांनी पौरोहित्य केले. जिल्हाध्यक्ष किरण गावडे, शहर कार्यवाह विश्वनाथ पाटील, शहर प्रमुख अजित जाधव, विभाग प्रमुख पुंडलिक चव्हाण, अनंत चौगुले यांच्या हस्ते होमहवन करून ज्वाला शांत करण्यात आली.

यावेळी बोलताना किरण गावडे म्हणाले, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांनी धर्मासाठी दिलेल्या बलिदानाची आठवण आजच्या पिढीला होण्यासाठी बलिदान मास पाळण्यात येतो. प्रत्येक युवक काही पदार्थ, वस्तूंचा त्याग करत मुंडणही करून घेतात. यामुळे संभाजी महाराजांच्या बलिदानाची त्यांना आठवण होते. यापुढील काळात प्रत्येक कुटुंबामध्ये बलिदान मास पाळण्यासाठी जागृती केली जाईल, असे त्यांनी सांगितले.

संभाजी चौकाचे काम महिन्याभरात पूर्ण करा

मागील दोन वर्षांपासून धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज मूर्तीसभोवताली सुशोभिकरणाचे काम सुरू आहे. परंतु हे काम अत्यंत संथगतीने असल्याने याचा फटका येथे येणाऱया शंभूभक्तांना होत आहे. निधीचा अभाव असल्याने काम जर रखडत असेल तर बेळगावचे नागरिक लोकवर्गणीतून सुशोभिकरणाचे काम पूर्ण करतील. दि. 12 मे पर्यंत काम पूर्ण न केल्यास शिवभक्त हे काम पूर्ण करतील, असा इशारा जिल्हाध्यक्ष किरण गावडे यांनी दिला.

Related Stories

गांजाविक्री प्रकरणी युवकास अटक

Patil_p

सोमनाथ मंदिरच्या ट्रस्टींची कपिलेश्वर मंदिराला भेट

Amit Kulkarni

पदवीपूर्व प्रथम वर्षाला प्रारंभ

Amit Kulkarni

कपिलनाथ युवक मंडळातर्फे मास्क-सॅनिटायझरचे वाटप

Amit Kulkarni

मारिहाळ गावच्या सुपुत्राची बाजी

Patil_p

अन्नोत्सवात खवय्यांची गर्दी

Patil_p
error: Content is protected !!