तरुण भारत

निवडणुकीतून मराठी अस्मितेचे दर्शन घडवा

उमेदवार शुभम शेळके यांचे मतदारांना आवाहन : वडगाव-खासबाग-जुने बेळगाव परिसरात जोरदार प्रचार

प्रतिनिधी / बेळगाव

Advertisements

मराठी भाषा व सीमावासीय या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. त्यामुळे मागील 65 वर्षांपासून मायमराठीसाठी सीमावासीय लढा देत आहेत. मराठी भाषा व संस्कृतीवर घाला घालण्याचा वेळोवेळी प्रयत्न होतो आहे. परंतु याला सीमावासीय जुमानत नाहीत. मराठी भाषा टिकवायची असेल तर सीमाभागात म. ए. समितीशिवाय पर्याय नाही. त्यामुळे लोकसभा पोटनिवडणुकीच्या माध्यमातून मराठी अस्मितेचे दर्शन घडवा, असे आवाहन मध्यवर्ती म. ए. समितीचे उमेदवार शुभम शेळके यांनी वडगाव येथे आयोजित केलेल्या प्रचारफेरीवेळी मतदारांना केले.

सोमवारी बेळगाव शहरासोबतच तालुक्मयाच्या विविध भागांमध्येही प्रचाराचा धडाका सुरू होता. सकाळी टीचर्स कॉलनी खासबाग, कुंतीनगर, श्रृंगेरी कॉलनी या परिसरात प्रचार करण्यात आला. घरोघरी जावून आज समितीची सर्वांना काय गरज आहे याची माहिती मतदारांना करून देण्यात आली. म. ए. समितीच्या कार्यकर्त्यांनी आपापल्या विभागात जोरदार प्रचार सुरू ठेवला आहे.

खासबाग, जुने बेळगाव परिसरात घुमले भगवे वादळ

भगवे फेटे, टोप्या, भगवे झेंडे घेऊन सोमवारी खासबाग, जुने बेळगाव परिसरात भव्य प्रचारफेरी काढण्यात आली. हा संपूर्ण परिसर भगवामय झाला होता. मनपावर भगवा लावण्यास विरोध होत असला तरी आमच्या मनात भगवाच असल्याचे यातून दर्शविण्यात आले. ‘संयुक्त महाराष्ट्राच्या’ घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. मराठी भाषिक युवकांनी स्वयंस्फूर्तीने प्रचारात सहभाग घेतला. त्यामुळे म. ए. समितीचा विजय निश्चित असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे. माजी लोकप्रतिनिधींनी प्रचाराची धुरा सांभाळली.

गल्लोगल्लीत जोरदार स्वागत

खासबाग, जुने बेळगाव येथे शुभम शेळके यांचे फटाक्मयांच्या आतषबाजीत जोरदार स्वागत करण्यात आले. महिलांनी औक्षण करून त्यांना विजयाचा आशीर्वाद दिला. प्रत्येक गल्लीच्यावतीने कोपऱया-कोपऱयांवर त्यांचे स्वागत करण्यात येत होते. सीमावासियांचा मिळालेला प्रतिसाद माझा पहिला विजय असल्याची प्रतिक्रिया शुभम शेळके यांनी दिली. यावेळी युवकांमधील उत्साह मोठा होता.

आज येथे होणार प्रचार

सकाळी 9 पासून कपिलेश्वर ओव्हरब्रिज, एसपीएम रोड, महाद्वार रोड, आठल्ये गल्ली, गुड्सशेड रोड, शास्त्राrनगर, संतसेना रोड या भागात प्रचार होणार आहे.  सायंकाळी बेळगाव उत्तर भागात प्रचार केला जाणार आहे.

Related Stories

अनगोळचे भाविक सौंदत्ती यात्रेला जाणार

Amit Kulkarni

कारदगा येथे हस्तकला व्यावसायिकांना जीवनावश्यक साहित्य वाटप

tarunbharat

टिळकवाडी पोलिसांनी केली कोरोनाबाबत जनजागृती

Patil_p

वडगाव रोडवरील उघडय़ा डेनेज चेंबरचा वाहनधारक-नागरिकांना धोका

Amit Kulkarni

वकिलांच्या ‘त्या’ ठरावाला मनाई नाही

Patil_p

अखेर विशेष बसने प. बंगालचे कामगार रवाना

Patil_p
error: Content is protected !!