तरुण भारत

पंचांगकर्त्यांनी उभारली समाधानकारक पावसाची गुढी

कृषी क्षेत्रासाठी ‘शुभ संदेश’: प्रारंभीच्या काळात पर्जन्यमान मध्यम : मधल्या काही नक्षत्रांमध्ये अनुकूल पावसाचे वर्तविले भाकित

प्रतिनिधी / बेळगाव

Advertisements

सध्याच्या कोरोना उद्रेकाच्या आव्हानात्मक आणि तणावग्रस्त काळात सुप्रसिद्ध पंचांगकर्त्यांनी नूतन संवत्सराच्या पंचांगांमध्ये समाधानकारक पावसाचे संतोषजनक अनुमान वर्तविले आहे. त्यांनी पाडव्याच्या दिवशी जणू समाधानकारक पावसाचीच गुढी उभारली आहे, अशी प्रतिक्रिया यामुळे व्यक्त होत आहे. पंचांगकर्त्यांच्या भाकितानुसार यंदा पर्जन्यमान सरासरीपेक्षा काहीसे कमी राहणार असले तरी ते पुरेसे असेल आणि त्यामुळे कृषीसाठी उपयुक्त असेल. 

सृष्टीचे चक्र अव्याहत सुरूच असते. निसर्ग आपल्या कर्तव्यामध्ये कधीच कसूर करत नाही. माणूस नेहमीच निसर्गावर अवलंबून राहिला आहे. त्यामुळे पाऊस पिकपाणी, हवामान याबद्दल त्याला नेहमीच जाणून घेण्याची जिज्ञासा असते. ही जिज्ञासा पंचांग पूर्ण करतात. दरवषी गुढीपाडव्याला पंचांगांची पूजा केली जाते आणि  पंचांगाचे वाचनही केले जाते. यामध्ये महत्त्वाचे वाचन असते ते पर्जन्यमानाचे.

पंचांगातील पर्जन्यमानानुसार शेतकरी आपले शेतीचे चक्र ठरवितो. त्यामुळे पंचांग त्याला नेहमीच साहाय्यभूत ठरले आहे. पर्जन्यमानाबरोबरच शेतीच्या कामासाठीचे मुहूर्त, विवाह मुहूर्त, शुभाशुभ दिवस, श्राद्धपक्ष विधी या सर्वांचीच माहिती पंचांगात मिळते. मानवी जीवनामध्ये पंचांगाचे महत्त्व आजही अबाधित आहे. याचे कारण पंचांगातील नोंदणीनुसार तसे अनुभव मानवी समुहाला आले आहेत.

सोलापूरच्या दाते पंचांगाची विश्वासार्हता 106 वर्षांपासून आजही टिकून आहे. (कै.) धुंडीराज दाते यांनी प्रथम पंचांग तयार केले. तेव्हापासून आजपर्यंत ही परंपरा सुरू आहे. सध्या अनंत दाते आणि विनय श्रीधर दाते, ओंकार अनंत दाते यांनी पंचांग तयार केले आहे. पर्जन्यमानासाठी त्यांना सिद्धेश्वर मारटकर यांचे सहकार्य लाभले.

यंदाच्या पर्जन्यमानाचा विचार करता एप्रिलच्या मध्यानंतर वळवाचा पाऊस होण्याची शक्मयता आहे. 19 एप्रिलला रवी-बुध युतीमुळे उष्णतामान वाढणार आहे. 23 एप्रिलची शुक्र हर्षल युती व 24 एप्रिलच्या बुध-हर्षल युतीमुळे तापमानात चढ-उतार होत राहतील. 29 मेच्या बुध-शुक्र युतीमुळे प्रारंभीच्या काळात पर्जन्यमान मध्यम राहील. मधली काही नक्षत्रे पर्जन्यास अनुकूल आहेत. पण एकंदरीत पर्जन्यमान सरासरीपेक्षा कमी राहील.

मृग नक्षत्र- मंगळवार दि. 8 जून रोजी सकाळी 6.40 वाजता सूर्य मृग नक्षत्रात प्रवेश करत आहे. या नक्षत्राचे वाहन गाढव असून मंगळ-गुरु-शनि जल नाडीत आहेत. 11 जूनची रवी-बुध युती ऋतू उत्तेजक आहे. मात्र 29 मे ला होणाऱया बुध-शुक्र युतीचा विचार करता या नक्षत्राचा पाऊस मध्यम होईल व उष्णतामान फारसे कमी होईल, असे दिसत नाही. दि. 12 ते 18 पर्यंत पाऊस अपेक्षित आहे.

आर्द्रा नक्षत्र- दि. 21 जून रोजी सोमवारी उत्तररात्री म्हणजे पहाटे 5.38 वाजता सूर्याचा आर्द्रा नक्षत्रात प्रवेश होत आहे. या नक्षत्राचे वाहन कोल्हा असून मंगळ-गुरु-शुक्र-शनि हे जल नाडीमध्ये आहेत. त्यामुळे पूर्वार्धात पाऊस उत्तम पडेल. 1 जुलैला होणाऱया मंगळ-शनि प्रतियुतीनंतर पर्जन्यमान कमी राहील. भूकंप होण्याची शक्मयता दिसते. दि. 26 ते 30 पर्यंत पाऊस अपेक्षित.

पुनर्वसू नक्षत्र- 5 जुलै रोजी उत्तररात्री म्हणजे मंगळवारी पहाटे 5.16 वाजता सूर्याचे पुनर्वसू नक्षत्र सुरू होत आहे. प्रवेशावेळी मिथून लग्न असून वरुण मंडल योग होत आहे. मंगळ-गुरु-शुक्र व शनि हे ग्रह जल नाडीतून जाणार असून नक्षत्राचे वाहन उंदीर आहे. 5 जुलैची मंगळ-शनि प्रतियुती, 7 जुलैची शुक्र-शनि प्रतियुती व 13 जुलैची शुक्र-मंगळ युती यांचा विचार करता मध्यम वृष्टीचे योग आहेत. दि. 10 ते 15 पर्यंत पाऊस अपेक्षित आहे.

19 जुलै रोजी उत्तररात्री म्हणजे मंगळवारी पहाटे 4.44 वाजता सूर्य पुष्य नक्षत्रात प्रवेश करीत आहे. त्यावेळी मिथून लग्न असून वरुण मंडल योग आहे. या नक्षत्राचे वाहन घोडा असून रवी-मंगळ-गुरु, शुक्र व शनि हे जल नाडीत आहेत. 22 जुलैची गुरु-शुक्र प्रतियुती व 29 जुलैची मंगळ-गुरू प्रतियुती यांचा विचार करता या नक्षत्राच्या उत्तरार्धात पाऊस जोर धरेल. दि. 23 ते 29 पर्यंत पाऊस अपेक्षित आहे.

आश्लेषा नक्षत्र- दि. 2 ऑगस्ट रोजी सोमवारी उत्तर रात्री म्हणजेच मंगळवारी पहाटे 3.42 वाजता सूर्य आश्लेषा नक्षत्रात प्रवेश करीत आहे. प्रवेशसमयी मिथून लग्न असून वरुण मंडल योग आहे. नक्षत्राचे वाहन मोर असून रवी, मंगळ-बुध, गुरु, शुक्र व शनि हे ग्रह जल नाडीत आहेत. 1 ऑगस्टची ऋतुउत्तेजक रवी-बुध युती, 1 ऑगस्टची बुध-शनि प्रतियुती, 2 ऑगस्टची रवी-शनि प्रतियुती, 9 ऑगस्टची शुक्र-नेपच्यून प्रतियुती व 11 ऑगस्टची बुध-गुरू प्रतियुती यांचा एकत्रित विचार करता या नक्षत्राचा पाऊस लहरी दिसत आहे. काही भागात चांगली वृष्टी होईल. दि. 4 ते 12 पर्यंत पाऊस अपेक्षित.

मघा नक्षत्र- दि. 16 ऑगस्ट रोजी उत्तर रात्री 1.17 वाजता सूर्याचे मघा नक्षत्र सुरू होत आहे. त्या वेळेस वृषभ लग्न होत असून इंद्र मंडल योग होत आहे. या नक्षत्राचे वाहन गाढव असून रवी-मंगळ-बुध-गुरु-शुक्र व शनि हे ग्रह जल नाडीत आहेत. 19 ऑगस्टची रवी-गुरु प्रतियुती व मंगळ-बुध युती यांचा विचार करता या नक्षत्राचा पाऊस समाधानकारक होईल. मात्र, काही भागात वारा सुटून ढग निघून जाण्याच्या घटना घडतील. दि. 20 ते 26 पर्यंत पाऊस होईल.

पूर्वा नक्षत्र- दि. 30 ऑगस्ट रोजी सोमवारी रात्री 9.20 वाजती सूर्य पूर्वा नक्षत्रात प्रवेश करीत आहे. प्रवेशसमयी मेष लग्न असून वायु मंडल योग होत आहे. या नक्षत्राचे वाहन बेडूक असून रवी-मंगळ-बुध-गुरु व शनि हे ग्रह जल नाडीत आहेत. 2 सप्टेंबरची मंगळ-नेपच्युन प्रतियुती, 14 सप्टेंबरची रवी-नेपच्युन प्रतियुती अल्पवृष्टी दर्शविते. या नक्षत्राचा पाऊस मध्यम ते कमी प्रमाणात होईल व सर्वत्र होणार नाही. दि. 3 ते 8 सप्टेंबर पर्यंत पाऊस अपेक्षित.

उत्तरा नक्षत्र- दि. 13 सप्टेंबर रोजी सोमवारी दुपारी 3.6 वाजता सूर्याचे उत्तरा नक्षत्र सुरू होत असून त्या वेळेस धनू लग्न असून याचे वाहन म्हैस आहे. रवी-मंगळ-गुरु व शनि हे ग्रह जल नाडीत आहेत. या नक्षत्राचा पाऊस मध्यम प्रमाणात  असून काही भागात पिकांना उपयुक्त असणार आहे. तापमानात वाढ होईल. 16 ते 22 दरम्यान पाऊस अपेक्षित.

हस्त नक्षत्र- दि. 27 सप्टेंबर रोजी सोमवारी सकाळी 6.42 वाजता सूर्य हस्त नक्षत्रात प्रवेश करणार आहे. प्रवेशसमयी कन्या लग्न असून वायू मंडल योग आहे. या नक्षत्राचे वाहन घोडा असून रवी-गुरु-शनि हे गृह जल नाडीत आहेत. पाऊस उत्तरार्धात शेवटी बऱयापैकी होईल, पण खंडित वृष्टीचे योग आहेत. दि. 1 ते 6 ऑक्टोबर दरम्यान पाऊस अपेक्षित.

चित्रा नक्षत्र- दि. 10 ऑक्टोबर रोजी रात्री 8 वाजून 19 मिनिटांनी सूर्याचा चित्रा नक्षत्रात प्रवेश होत आहे. मेष लग्न उदित आहे. अग्नि मंडल योग असून पर्जन्यसूचक मोर हे वाहन आहे. 9 ऑक्टोबरच्या रवी-बुध युतीमुळे या नक्षत्रात पर्जन्यमान चांगले राहील. पण 9 ऑक्टोबरच्या मंगळ-बुध युतीमुळे काही भागात पाऊस ओढ धरेल. दि. 13 ते 19 पर्यंत पाऊस अपेक्षित.

स्वाती नक्षत्र- 23 ऑक्टोबर रोजी शनिवारी उत्तररात्री म्हणजे रविवारच्या पहाटे 6.12 वाजता सूर्य स्वाती नक्षत्रात प्रवेश करीत आहे. तुळ लग्न असून वायू मंडल योग आहे. या नक्षत्राचे वाहन गाढव असून गुरु व शनि जल नाडीत आहेत. या नक्षत्राचा पाऊस फारसा होणार नाही. पण काही भागात पिकास पोषक असाच होईल. 28 ते 31 पर्यंत पाऊस अपेक्षित. याचप्रमाणे कोल्हापूरच्या लाटकर पंचांगाचे हे 112 वे वर्ष असून कै. शं. ग. लाटकर, कै. वा. शं. लाटकर यांनी हे पंचांग सुरू केले. सध्या मेघःशाम लाटकर यांनी ही परंपरा पुढे सुरू ठेवली आहे. या पंचांगातही सर्व ऋतु, सण-वार, भविष्य, सूर्योदय, सूर्यास्त यांची माहिती आहे. श्री मदुत्तरादिमठातर्फे प्लवनामसंवत्सरस्य हे पंचांग प्रकाशित करण्यात आले आहे. श्री महालक्ष्मी व रुईकर ही पंचांगेसुद्धा बाजारात आली आहेत. पाडव्याच्या निमित्ताने पंचांग खरेदी करण्याची परंपरा आजही अखंड आहे.

Related Stories

अंगडी यांना श्रध्दांजली

Omkar B

परिवहनचे कर्मचारी संपातून सुटले; कर्फ्यूत अडकले

Amit Kulkarni

हुबळी-धारवाड बायपासवर ‘ओव्हरटेक’ वर उपाययोजना

tarunbharat

26 नोव्हेंबरचा संप यशस्वी करणार

Patil_p

रामकृष्ण मिशन आश्रमतर्फे उद्यापासून ऑनलाईन व्याख्यानमाला

Omkar B

बेंगळूर: जलद प्रतिजैविक चाचणी अहवालांपैकी ९.४१ टक्के पॉझिटिव्ह

Shankar_P
error: Content is protected !!