तरुण भारत

गारेगार बदाम गुलकंद कुल्फी

उन्हाळ्यात थंडगार कुल्फी हवीहवीशी वाटते. कोरोनामुळे बाहेरची कुल्फी खाता येत नसली म्हणून काय झालं? तुम्ही घरीच कुल्फी करू शकता. केशर-पिस्ता, आंबा कुल्फी नेहमीच केली जाते. यंदा वेगळ्या चवीची बदाम-गुलकंद कुल्फी करून बघा. 

साहित्य : 200 ग्रम बदाम, गुलाबाची पानं 40 ग्रम, 30 ग्रम गुलकंद, सायीचं दूध दीड लीटर, 80 ग्रम खवा, 70 ग्रम साखर, आठ ते दहा केशर कांडय़ा, तीन कप पाणी

Advertisements

 कृती : एका टोपात दोन कप पाणी  घेऊन त्यात बदाम घालून साधारण पाच मिनिटं उकळून घ्या. गॅस बंद करून पाणी गाळून टाका. बदाम थंड होऊ द्या. मग बदामाची सालं काढून घ्या. मिक्सरच्या भांडय़ात बदाम आणि अर्धा कप दूध घालून वाटून घ्या. आता पाक तयार करण्यासाठी भांडय़ात अर्धा कप पाणी, गुलाबाची पानं आणि साखर घालून घट्ट होईपर्यंत शिजवून घ्या. आत एका वाटीत चार चमचे दूध आणि केशराच्या कांडय़ा घाला. यानंतर एका टोपात दूध घालून अर्ध होईपर्यंत आटवून घ्या. त्यानंतर यात खवा, साखरेचा पाक, केशराचं दूध, गुलकंद आणि बदामाची पेस्ट घालून मिश्रण घट्ट होईपर्यंत शिजवून घ्या. यानंतर मिश्रण थोडं थंड होऊ द्या. मग कुल्फी मोल्डमध्ये मिश्रण भरून फ्रिजरमध्ये ठेवा. साधारण सहा तासांनी मोल्ड बाहेर काढा आणि गारेगार बदाम-गुलकंद कुल्फीचा आस्वाद घ्य

Related Stories

पालक पकोडा चाट

Omkar B

भरवा पनीर

Omkar B

स्टफ्ड कटलेट

Omkar B

शेवगा पराठा

Omkar B

कुरकुरी दही

Omkar B

मस्त टोमॅटो पुरी

Amit Kulkarni
error: Content is protected !!