तरुण भारत

तरुण तजेलदार त्वचेसाठी

प्रत्येकीलाच तरुण दिसायचं असतं. तरुण दिसण्यासाठी त्वचेची विशेष काळजी घ्यावी लागते. मात्र फक्त क्रीम्स चोपडून किंवा ब्युटी रूटिनचा अवलंब करून त्वचा तरुण आणि तजेलदार ठेवता येत नाही. यासाठी काही सवयी बदलाव्या लागतात. वयाची तिशी उलटून गेल्यानंतर त्वचेवर वार्धक्याच्या खुणा दिसू लागतात. सुरकुत्या,फाईन लाईन्समुळे कमी वयात आपण म्हातारे दिसू लागतो. हे टाळण्यासाठी काय करता येईल? जाणून घेऊ.

  • त्वचा तरुण आणि तजेलदार ठेवण्यासाठी शक्यतो सौम्य फेसवॉशचा वापर करा. ग्लिसरिनयुक्त फेसवॉशची निवड करणं योग्य ठरतं. तेलकट त्वचा असल्यास क्रीमी तर कोरडी त्वचा असल्यास जेलबेस्ड फेसवॉश वापरायला हवा.
  • * कडक उन्हात बाहेर पडण्यासाठी सन्सस्क्रीन लावायला विसरू नका. सूर्याच्या अतिनील किरणांमुळं त्वचेवर विपरित परिणाम होतो हे आपण जाणतो. म्हणूनच उन्हात बाहेर पडण्याच्या किमान पंधरा मिनिटं आधी सन्सस्क्रीन लावा. ई जीवनसत्त्वयुक्त सन्सस्क्रीनची निवड करा. उन्हात फिरावं लागत असेल तर एसपीएफ 30 किंवा त्यापेक्षा अधिक क्षमतेचं सन्सस्क्रीन विकत घ्या.
  • बर्याच सौंदर्यप्रसाधनांमध्ये रेटिनॉलचा वापर होतो. त्वचेवरील सुरकुत्या, फाईन लाईन्स तसंच काळे डाग कमी करण्यात रेटिनॉल महत्त्वाची भूमिका बजावतं. त्यामुळे नाईट क्रीम किंवा अन्य सौंदर्यप्रसाधनं घेताना त्यात रेटिनॉल आहे ना, याची खात्री करून घ्या.
  • त्वचेचं सौंदर्य खुलवण्यासाठी फक्त बाह्य उपाय करून भागणार नाही. उन्हाळ्यात त्वचेला ओलावा टिकवून ठेवणं आवश्यक असतं. यासाठी दिवसभरात सात ते आठ ग्लास पाणी प्या. ताजी फळं, भाज्या यांचा आहारात समावेश करा. यामुळे शरीराला आवश्यक जीवनसत्त्वं, खनिजं मिळतील आणि त्वचाही तजेलदार दिसेल. 
  • त्वचेचं सौंदर्य टिकवण्यात झोपेचीही महत्त्वाची भूमिका असते. म्हणूनच सात ते आठ तास शांत झोप घ्या. तसंच त्वचेला साजेसं नाईट क्रीमही लावा. रात्री झोपेत असताना शरीराची झीज भरून निघत असते. याच काळात त्वचेची दुरुस्ती होत असते. अशा परिस्थितीत नाईट क्रीम त्वचेला नवतजेला देऊन जाईल.
  • नियमित व्यायामानेही त्वचेचं सौंदर्य खुलवता येईल.

Related Stories

सेल्फी नाही…‘मास्की’!

Omkar B

मैत्री टिकत नाही !

Omkar B

तापसि आशि राहते फिट

Amit Kulkarni

फंडा नो कॉस्ट ईएमआयचा

Omkar B

हवा एसपीएफयुक्त मॉईश्चरायझर

Omkar B

सोशल मीडिया आणि नातेसमंध

Amit Kulkarni
error: Content is protected !!