तरुण भारत

कोरोना योध्द्यांसाठी सुरू होणार समन्वय कक्ष : ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत

ऑनलाईन टीम / मुंबई :

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू झालेल्या लॉकडाऊन कालावधीत अहोरात्र अविरतपणे सेवा देणाऱ्या महानिर्मिती, महावितरण व महापारेषणच्या कोरोना योध्द्यांसाठी तातडीने ‘कोव्हीड- 19 समन्वय कक्ष ‘ स्थापन करण्याचे निर्देश राज्याचे ऊर्जामंत्री डॉ नितीन राऊत यांनी आज दिले आहेत.

Advertisements

कोविडच्या या काळात महानिर्मिती, महावितरण व महापारेषणच्या कर्मचारी हे अविरतपणे ग्राहकांना आपली सेवा देतात. सद्यस्थितीत उद्भवलेल्या कोरोना महामारीच्या या संकटांत या वीज कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांना या आजारापासून संरक्षण मिळावे यासाठी ऊर्जामंत्री डॉ. राऊत यांच्या आदेशानुसार,प्रत्येक परिमंडळ कार्यालयात ‘कोव्हीड- 19 समन्वय कक्षा’ ची स्थापना करण्यात येणार आहे.


गेल्या वर्षी कोरोनाचे भीषण संकट असूनही जीवाची पर्वा न बाळगता महानिर्मिती, महावितरण व महापारेषणच्या कर्मचाऱ्यांनी राज्याला अखंडित वीज पुरवली. या काळात कोरोनाने जवळपास ६० कर्मचाऱ्यांचा जीवही गेला. यावर्षी कोरोनाग्रस्त कर्मचाऱ्यांना तातडीने मदत व उपचार मिळावे यासाठी डॉ. राऊत यांनी हे निर्देश दिले आहेत.


एखाद्या कर्मचाऱ्याला कोरोनाचा संसर्ग झाल्यास तातडीने रुग्णालयात उपचारांसाठी खाटा आणि आरोग्यविषयक मदत उपलब्ध व्हावी, तसेच या वीज कंपन्यातील सर्व अधिकारी-कर्मचारी यांचे तातडीने लसीकरण करण्यात यावे, सोबतच विविध आरोग्य यंत्रणांशी समन्वय साधण्यासाठी प्रत्येक परिमंडळ कार्यालयात उभारण्यात येणाऱ्या कोव्हीड- 19 समन्वय कक्षातून तातडीने मदत उपलब्ध केली जावे असे निर्देशही डॉ. राऊत यांनी यावेेळी दिलेे आहेत.

Related Stories

कोरोना संदर्भात राज्यात एकूण १ लाख १० हजार गुन्हे दाखल

triratna

महाराष्ट्रात गेल्या चोवीस तासात 1495 नवीन कोरोना रुग्ण

pradnya p

लोप पावत चाललेल्या पादत्राणांना ‘त्याच्या’ स्टार्टअपचे व्यासपीठ

amol_m

उद्धव ठाकरे यांचा एकेरी उल्लेख करणाऱ्या कंगनावर गुन्हा दाखल

pradnya p

लॉक डाऊन संपल्यावर आर्थिक संकट, अर्थव्यवस्थेवर परिणाम : शरद पवार

pradnya p

बीड : रिक्षा आणि ट्रकची जोरदार धडक; 5 जण जागीच ठार, 8 जखमी

pradnya p
error: Content is protected !!