तरुण भारत

अजित पवारांनी ब्रीच कँडी रुग्णालयात घेतली शरद पवारांची भेट

मुंबई \ ऑनलाईन टीम

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर सोमवारी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात पित्ताशयावर दुसरी शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली आहे. त्यानंतर आज, मंगळवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शरद पवारांची ब्रीच कँडी रुग्णालयात जाऊन शरद पवार यांची भेट घेत तब्येतीची विचारपूस केली.

यावेळी माध्यमांशी बोलताना अजित पवार म्हणाले की, शरद पवार यांची प्रकृती स्थिर असून दोन दिवसांत डिस्चार्ज मिळणार आहे. तसेच राज्यातील जनतेला गुढी पाडव्याच्या शुभेच्छा देखील यावेळी अजित पवारांनी दिल्या.

पोटदुखीच्या तक्रारीनंतर मागील महिन्यात पवारांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पित्ताशयातील खडा हे त्यांच्या पोटदुखीचं कारण असल्याचं तपासणीनंतर समोर आलं होतं. डॉक्टरांनी त्यांना शस्त्रक्रियेचा सल्ला दिला होता. त्यानंतर ३० मार्च रोजी रात्री पवारांवर एन्डोस्कोपी शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यानंतर ३ एप्रिलला त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आलं होतं. मात्र, दुसरी शस्त्रक्रिया करावी लागणार असल्याचं डॉक्टरांनी त्याचवेळी स्पष्ट केलं होतं. त्यानुसार काल सोमवारी सकाळी शरद पवार यांच्यावर लॅप्रोस्कोपी करण्यात आली. डॉ. बलसारा यांनी ही शस्त्रक्रिया केली.

Related Stories

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या ताफ्यातील पोलीस वाहनाला अपघात

pradnya p

अलगीकरण कक्षापर्यंत पोहोचले राजकारण

Shankar_P

शिकारीचं अडकले जाळ्यात

Patil_p

धक्कादायक : कुलर सुरू करण्यासाठी व्हेंटिलेटरचा प्लग काढल्याने रुग्णांचा मृत्यू

pradnya p

महाराष्ट्रात मागील 24 तासात 7 हजारपेक्षा अधिक रुग्ण कोरोनामुक्त!

pradnya p

महाराष्ट्रातील लॉकडाऊन 30 नोव्हेंबरपर्यंत वाढवले

pradnya p
error: Content is protected !!