तरुण भारत

दिल्लीत कोरोनाचा उद्रेक : सीबीएसई परीक्षा रद्द करा; केजरीवाल यांची मागणी

  • केजरीवाल म्हणाले, नाहीतर…परीक्षा हॉल बनतील हॉटस्पॉट 


ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : 


दिल्लीत वाढत चाललेली कोरोनाची रुग्ण संख्या लक्षात घेत मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मंगळवारी सांगितले की, दिल्ली सरकार आताच्या परिस्तिथीबाबत पूर्णपणे सतर्क असून या सामना करण्यासाठी आवश्यक त्या मार्गांचा अवलंब करीत आहे. 

Advertisements


सीबीएसई परीक्षेबाबत बोलताना पुढे ते म्हणाले,  विद्यार्थ्यांची सुरक्षा देखील महत्वाची आहे. सद्य स्थितीत वाढत असलेली रुग्ण संख्या पाहता ही परीक्षा रद्द करण्यात यावी अशी मागणी केंद्र सरकारकडे करीत आहे. 6 लाख विद्यार्थी ही परीक्षा देणार आहेत तर यासाठी एक लाख शिक्षक असणार आहेत. आणि जर आपण सुरक्षेच्या नियमांचे पालन करू शकलो नाहीतर ही परीक्षा केंद्रे हॉटस्पॉट बनण्याची शक्यता आहे. त्यामुळे माझी केंद्राकडे मागणी आहे की ही परीक्षा रद्द करण्यात यावी. या ऐवजी ऑनलाईन तथा इंटरनल असेलमेंट वर विचार केला जावा. 


पुढे ते म्हणाले, आवश्यकता नसेल तर कोणीही घराबाहेर पडू नये. आपणच आपल्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे. आम्ही पण लॉकडाऊन लावण्यासाठी तयार नाही आहोत. त्यासाठी एक प्लॅन तयार होत आहे. आम्ही बॅक्वेट हॉल आणि हॉटेलला एकत्र करीत आहोत. कमी लक्षणे असलेल्या रुग्णांना बॅक्वेट हॉलमध्ये ठेवले जाणार आहे. कोणाला ऑक्सीजनची गरज असली तरी बॅक्वेट हॉलमध्ये उपचार होऊ शकतील. तसेच बेड ची संख्या देखील आम्ही वाढवत आहोत. सरकारी आणि खाजगी रुग्णालयांना 100 टक्के कोविड रुग्णालय म्हणून घोषित केले आहे. 

Related Stories

मोदींचा हनुमान : चिरागने केले काम

Patil_p

20 नंतरही लॉकडाऊन यथःस्थिती

Patil_p

ही कसली डॉक्टरी?

datta jadhav

देशात 31,522 नवे कोरोना रुग्ण; 412 मृत्यू

Rohan_P

ईशान्येशिवाय भारत अन् भारतीय संस्कृती अपूर्ण!

Patil_p

मोदी सरकारकडून गरीबांची फसवणूक

Patil_p
error: Content is protected !!