तरुण भारत

अप्रत्यक्ष कर संकलनात 12 टक्क्यांची वाढ

2020-21 मधील आकडेवारी

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisements

 अर्थ मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार आर्थिक वर्ष 2020-21 मध्ये निव्वळ अप्रत्यक्ष कर संकलन या अगोदरच्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत 12.3 टक्क्यांनी वाढून 10.71 लाख कोटी रुपयावर राहिले आहे. आर्थिक वर्ष 2019-20 मध्ये अप्रत्यक्ष कर संकलन हे 9.54 लाख कोटी रुपयावर राहिले असून यामध्ये जीएसटी, सीमाशुल्क आणि उत्पादन शुल्काचा समावेश आहे. आर्थिक वर्ष 2020-21 च्या संशोधित अंदाजानुसार (आरई) 9.89 लाख  कोटी रुपयाच्या संकलनाचे ध्येय निश्चित केले होते.

वर्ष 2020-21 मध्ये केंद्राचे निव्वळ जीएसटी संकलन हे 5.48 लाख कोटीवर राहिले, ज्यामध्ये सीमाशुल्कमधून 1.32 लाख कोटी रुपये प्राप्त झाले आहेत. आर्थिक वर्ष 2019-20 मध्ये 9.45 लाख कोटीच्या तुलनेत निव्वळ महसूल संकलन हे 10.71 लाख कोटीवर स्थिरावले आहे.

उत्पादन शुल्क-सेवाकर

उपलब्ध माहितीनुसार केंद्रीय उत्पादन शुल्क आणि सेवाकर यांच्या मदतीने निव्वळ कर संकलन हे 3.91 लाख कोटीवर राहिले असून यामध्ये मागील आर्थिक वर्षाच्या दरम्यान हा आकडा 2.45 लाख कोटीच्या घरात राहिल्याची नोंद केली आहे.

Related Stories

ऍपलचे बाजारमूल्य दोन ट्रिलियन डॉलरच्या घरात

Patil_p

यंदा सरासरी वेतनात 7 टक्के वाढ शक्य

Amit Kulkarni

सेन्सेक्स 55 हजारवर पोहचणार – मॉर्गन स्टॅनले

Patil_p

गुजरातमध्ये ‘टाटा पॉवर’ १२० मेगावॅट क्षमतेचा सौरऊर्जा प्रकल्प विकसित करणार

datta jadhav

पेट्रोलमध्ये इथेनॉलचे प्रमाण वाढवणार

Omkar B

9 नोव्हेंबरला ग्लँड फार्माचा आयपीओ

Omkar B
error: Content is protected !!