तरुण भारत

‘टीसीएस’चा नफा 15 टक्क्यांनी वाढला

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

आयटी क्षेत्रात सेवा देणारी देशातील दिग्गज कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (टीसीएस) ला आर्थिक वर्ष 2020-21 मधील चौथ्या तिमाहीमध्ये जोरदार नफा कमाई झाली असल्याची माहिती आहे. नुकत्याच सादर केलेल्या आपल्या अहवालात जानेवारी ते मार्च 2021 च्या कालावधीत कंपनीला एकूण नफा 9,282 कोटी रुपये झाल्याचे नेंदले आहे. मागच्या वर्षी समान कालावधीत नफा 8,093 कोटीच्या घरात पोहचला होता. म्हणजे सरासरी कंपनीच्या नफा कमाईत 14.69 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

Advertisements

जानेवारी ते मार्च तिमाहीत कंपनीचा महसूल 9.71 टक्क्यांनी वाढून 44,636 कोटीवर राहिला आहे. मागच्या वर्षी समान कालावधीत हा महसूल 40,684 कोटी रुपये राहिला होता. कंपनीचा करपश्चात नफा 12,527 कोटीवर राहिला असून जो मागील वर्षी 10,512 कोटी रुपये होता.

नवीन रोजगाराच्या संधी

माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील टीसीएसने दिलेल्या माहितीनुसार एप्रिल 2021 ते मार्च 2022 पर्यंत 40 हजार प्रेशर्सना रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे.

मागील आर्थिक वर्षातही कंपनीने 40 हजारपेक्षा अधिक जणांना रोजगाराच्या संधी दिल्याची माहिती आहे. कंपनीने चौथ्या तिमाहीच्या दरम्यान 19,388 कर्मचाऱयांची भरती केल्याची माहिती आहे.

Related Stories

दमदार फिचर्ससोबत हिरोची ‘एक्स्ट्रीम 200 एस’ दाखल

Omkar B

कोविडच्या संकटातही एसबीआयचा नफा उच्चांकावर

Omkar B

अमेझॉन सेलच्या विक्रीत 37 टक्के वाढ

Patil_p

आता ट्विटरची सेवा डाऊन?

Patil_p

टेक महिंद्राकडून 600 जणांची भरती

Patil_p

‘ किराणा’ची दिवाळी!

Patil_p
error: Content is protected !!