तरुण भारत

बाजारात सेन्सेक्स 660 अंकांनी मजबूत

जागतिक संकेताचा प्रभाव -निफ्टी 14,500 च्या टप्प्यावर

वृत्तसंस्था/मुंबई

Advertisements

चालू आठवडय़ातील दुसऱया दिवशी मंगळवारी भारतीय भांडवली बाजारात जागतिक बाजारातील सकारात्मक संकेतामुळे तेजी परतली आहे. मंगळवारी दिवसभरातील कामगिरीनंतर सेन्सेक्स 660 अंकांनी मजबूत झाल्याचे पहावयास मिळाले आहे. प्रमुख क्षेत्रांपैकी वाहन आणि आर्थिक कंपन्यांच्या समभागांच्या कामगिरीमुळे सेन्सेक्सने तेजी प्राप्त केल्याची नोंद केली आहे.

दिग्गज कंपन्यांपैकी तीस समभागावर आधारीत बीएसई सेन्सेक्सचा निर्देशांक 660.68 अंकांसह 1.38 टक्क्याच्या वाढीसोबत 48,544.06 वर बंद झाला आहे. दुसऱया बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीचा निर्देशांक 194 अंकांसह 1.36 टक्क्यांच्या मजबूतीसह 14,504.80 वर बंद झाल्याची नोंद केली आहे.

प्रमुख कंपन्यांमध्ये महिंद्रा ऍण्ड महिंद्राचे समभाग हे सर्वाधिक 8 टक्क्यांनी मजबूत स्थितीत राहिल्याचे दिसून आले. यासह बजाज फिनसर्व्ह, बजाज फायनान्स, मारुती सुझुकी, ऍक्सिस बँक, ओएनजीसी आणि एचडीएफसी बँक यांचे समभाग तेजीत राहिले होते. दुसऱया बाजूला टीसीएस, डॉ. रेड्डीज लॅब, टेक महिंद्रा, इन्फोसिस आणि नेस्ले इंडिया यांचे समभाग मात्र घसरणीमध्ये राहिले आहेत.

देशातील बाजारात चालू आठवडय़ातील दुसऱया सत्रात तेजीचा माहोल राहिला आहे. यामध्ये गुंतवणूकदारांना सरकारच्या घोषणेमुळे दिलासा मिळाला आहे. दुसरीकडे कोरोना प्रतिबंध लसीकरणाला मंजुरी प्रक्रियेला तेजी आल्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये नव्याने विश्वास निर्माण झाल्याने शेअर बाजार नफा कमाईत राहिल्याचे अभ्यासकांनी स्पष्ट केले आहे.

प्रमुख क्षेत्रांची कामगिरी

मंगळवारी शेअर बाजारात प्रामुख्याने आर्थिक कंपन्या आणि वाहन कंपन्या यांच्या योगदानामुळे बीएसई सेन्सेक्सला तेजी प्राप्त करता आली आहे. मंगळवारी बाजारात साधारणपणे आयटी आणि औषध कंपन्यांचे समभाग मात्र नुकसानीत राहिल्याचे दिसून आले.

Related Stories

आयआरबीला मिळाले 2 प्रकल्प

Amit Kulkarni

रेलीगेअरचा केदाराबरोबर करार पूर्ण

Patil_p

ऍमवे इंडिया करणार 30 कोटींची गुंतवणूक

Patil_p

सेन्सेक्स सावरत 453 अंकांनी मजबूत

Patil_p

चौफेर विक्रीने शेअर बाजार गडगडला

Patil_p

आर्थिक विकासदर 4 टक्क्मयांवर : एडीबी

Patil_p
error: Content is protected !!