तरुण भारत

कोल्हापूर : गांधीनगरमधून अकरा वर्षीय मुलाचे अपहरण

उचगाव / वार्ताहर

मैदानावर खेळायला गेलेल्या मनीषकुमार रामसेवक यादव या अकरा वर्षीय मुलाला अज्ञाताने फूस लावून अपहरण केल्याची फिर्याद त्याचे वडील रामसेवक बाबूलाल यादव ( सध्या रा. मसोबा मंदिर शेजारी, गुरूनानक कॉलनी गांधिनगर, मूळ रा. रामपूर मुराद, ता उतरवला, जि. बलरामपुर, उत्तर प्रदेश) यांनी दिली असून अज्ञातावर गुन्हा दाखल झाला आहे.

रामसेवक यादव यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की मनीषकुमार घराच्या मागील बाजूस असणाऱ्या मैदानावर खेळावयास गेला होता. नातेवाईक व परिसरात त्याचा शोध घेतला पण तो मिळून आला नाही. त्याचे अज्ञाताने फूस लावून अपहरण केले आहे. या फिर्यादीनुसार गांधीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.

दरम्यान, अतिरिक्त पोलीसप्रमुख बालाजी काकडे प्रत्यक्ष गांधीनगर येथे आले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली चार शोध पथके नेमली आहेत. उपविभागीय पोलिस अधिकारी आर आर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक भांडवलकर, पोलीस उपनिरीक्षक अतुल कदम व पोलिसांची पथके विविध ठिकाणी शोध घेत आहेत. दरम्यान, गांधीनगर येथील पंचगंगा नदी घाट परिसरात मंगळवारी अपहृत मुलाची कपडे व चप्पल शोध पथकातील पोलिसांना मिळाली आहेत. त्यामुळे या घटनेचे गांभीर्य वाढले असून अपहरण की घातपात याबाबत संभ्रमाचे वातावरण आहे.

Advertisements

Related Stories

ग्रामसेवक संवर्गाबद्द्ल केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ गगनबावडा येथे काम बंद आंदोलन

Sumit Tambekar

कोल्हापूर : उजळाईवाडी जवळील अपघातात एक ठार

Abhijeet Shinde

‘मराठा आरक्षण तुम्हाला का टिकवता आले नाही’?

Abhijeet Shinde

कोडोलीत कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडला; सर्वत्र खळबळ

Abhijeet Shinde

महावितरणचे 454 खांब, 11 रोहित्रे अवकाळी पावसाने जमीनदोस्त

Abhijeet Shinde

कोल्हापूर जिल्ह्यात ३ हजार ज्येष्ठांना लस

Abhijeet Shinde
error: Content is protected !!