तरुण भारत

हॉकी मानांकनात भारत पाचव्या स्थानी

वृत्तसंस्था/ लॉसेन

आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनने नुकत्याच घोषित केलेल्या पुरूषांच्या सांघिक मानांकनात भारताने पाचवे स्थान मिळविले आहे. भारतीय पुरूष संघाचे या ताज्या मानांकन यादीतील स्थान एका अंकांनी घसरले आहे.

Advertisements

भारतीय पुरूष हॉकी संघाने अर्जेंटिनाच्या दौऱयात झालेल्या प्रो लीग हॉकी स्पर्धेतील ऑलिंपिक विजेत्या यजमान अर्जेंटिनाविरूद्धचे दोन सामने जिंकले आहेत. रविवारी झालेल्या प्रो लीग स्पर्धेतील दुसऱया सामन्यात भारताने अर्जेंटिनाचा 3-0 असा पराभव केला. तत्पूर्वी शनिवारी झालेल्या पहिल्या सामन्यात मनप्रित सिंगच्या नेतृत्वाखालील भारतीय हॉकी संघाने पेनल्टी शूटआऊटमध्ये अर्जेंटिनाचा पराभव केला होता.

गेल्या जानेवारीमध्ये प्रसिद्ध करण्यात आलेल्या पुरूषांच्या सांघिक मानांकन यादीत भारतीय संघ चौथ्या स्थानावर होता. आता या मानांकन यादीत भारतीय पुरूष संघ  2223.458 गुणांसह पाचव्या स्थानावर आहे. विद्यमान विश्व आणि युरोपियन चॅम्पियन्स बेल्जियम 2602.31 गुणांसह पहिल्या स्थानावर असून ऑस्ट्रेलिया 2489.53 गुणांसह दुसऱया, जर्मनी 2253.48 गुणांसह तिसऱया, हॉलंड 2232.55 गुणांसह  चौथ्या, अर्जेंटिना 1923.42 गुणासह सहाव्या, इंग्लंड 1836.85 गुणांसह सातव्या, न्यूझीलंड 1680.08 गुणांसह आठव्या, स्पेन 1653.86 गुणांसह नवव्या, कॅनडा 1517.36 गुणांसह दहाव्या स्थानावर आहे.

महिला सांघिक हॉकी मानांकनात हॉलंड 2772.08 गुणांसह पहिल्या, अर्जेंटिना 2235.59 गुणांसह दुसऱया, जर्मनी 2153.30 गुणांसह तिसऱया, ऑस्ट्रेलिया 2112,90 गुणांसह चौथ्या, इंग्लंड 2052.38 गुणांसह पाचव्या, न्यूझीलंड 1920.84 गुणांसह सहाव्या, स्पेन 1902.12 गुणांसह सातव्या, आयर्लंड 1683.08 गुणांसह आठव्या, भारत 1643.00 गुणांसह नवव्या आणि चीन 1621.00 गुणांसह दहाव्या स्थानावर आहेत.

Related Stories

महेंद्रसिंग धोनी होणार आता मुंबईकर!

Patil_p

साईच्या प्रशिक्षकांची फिटनेस चांचणी होणार

Patil_p

माजी क्रिकेटपटू भास्कर कालवश

Omkar B

मॉरिन्हो रोमा संघाचे नवे प्रशिक्षक

Patil_p

हुतात्मा शंकरराव तोरस्कर यांचा 64 वा स्मृतीदिन 25 रोजी

triratna

आयसीसी वर्ल्डकपसाठी भारतीय महिला क्रिकेट संघ पात्र

Patil_p
error: Content is protected !!