तरुण भारत

रशियन टेनिसपटू मेदव्हेदेवला कोरोनाची लागण

वृत्तसंस्था/ माँटे कार्लो

रशियाचा द्वितीय मानांकित पुरूष टेनिसपटू डॅनिल मेदव्हेदेव याला कोरोनाची लागण झाल्याने येथे सुरू होणाऱया माँटे कार्लो मास्टर्स टेनिस स्पर्धेतून त्याने माघार घेतली आहे.

Advertisements

25 वर्षीय मेदव्हेदेवची कोरोना चाचणी घेण्यात आली आणि तो पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले. आता काही दिवसांसाठी त्याला आयसोलेशनमध्ये रहावे लागणार आहे. कोरोनाची बाधा झाल्याने त्याने माँटे कार्लो स्पर्धेतून माघार घेतली आहे. या स्पर्धेत आता मेदव्हेदेवच्या जागी अर्जेंटिनाच्या लॉनडेरोचा समावेश करण्यात आल्याची माहिती स्पर्धां आयोजकांनी दिली आहे.

Related Stories

जेव्हा नेटवर्कसाठी आयसीसी पंचांना झाडावर चढावे लागते!

Patil_p

आयपीएलवर कोरोनाचे सावट ; केकेआरच्या दोन खेळाडूंना कोरोनाची लागण

triratna

चेन्नईविरुद्ध केकेआरला विजय आवश्यक

Omkar B

पिरोन्कोव्हा, सेरेना, व्हिक्टोरिया अझारेन्का तिसऱया फेरीत

Patil_p

पॅरिस मास्टर्समधून जोकोविचची माघार

Patil_p

भारतात फेब्रुवारीत रंगणार फिफा यू-17 विश्वचषक

Patil_p
error: Content is protected !!