तरुण भारत

गुढी पाडवा साजरा

प्रतिनिधी/ सातारा

 ‘कोरोना विषाणु’चे संकट लवकरात लवकर टळो अशी प्रार्थना करत, शहर परिसरासह सर्वत्र पारंपारिक रित्या गुढी पाडवा हा सण मंगळवारी साजरा करण्यात आला. ‘साडेतीन मुहुर्ता पैकी एक मुहुर्त’ मानल्या जाणाऱया या सणाला महत्व देखिल तितकेच आहे. हिंदू पंचागाप्रमाणे नववर्षाची सुरूवात ही या दिवसापासुनच असते. यानिमित्ताने दारोदारी गुढी उभी केली जाते. ही गुढी अगदी सकाळ च्या दरम्यान काही नागरिक तर मुहुर्तानुसार ही गुढी उभी करण्यात आली.

Advertisements

 या सणाचे औचित्त्य साधुन कोणताही नविन व्यवसाय किंवा साहित्य ही या दिवशी घेतले जाते. पण यंदा मात्र लॉकडाऊन असल्याकारणाणे मात्र नागरिकांना खरेदीच करता आली नाही. त्यामुळे कित्तेक नागरिकांची चांगलीच निराशा झाली. मागील वर्षी ही लॉकडाऊन असल्याने या सणाचे औचित्य साधुन कोणतीच खरेदी करता आली नाही. तसेच यंदाही तिच परिस्थिती निर्माण झाली आहे.

 कित्तेक नागरिकांना तर गुढी उभी करण्याकरीता लागणारे वस्त्र, कळस किंवा तांब्या दुकाने बंद असल्याने नव्याने खरेदीच करता आली नाहीत. त्यामुळे घरात उपलब्ध असलेल्या साहित्याचा वापर करूनच ही गुढी उभी करण्यात आली. तसेच साखर गाठी तर दुप्पट किंमतीला विक्री करण्यात येत होत्या. नागरिकांना ही कोणताच पर्याय उपलब्ध नसल्याने आहे त्या किंमतीत साहित्य खरेदी करावे लागले होते.  

 काहीं नागरिकांनी तर व्यवसाय जरी बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले असले तरी परंपरे प्रमाणे आपल्या दुकानांसमोर गुढी उभी केली. तसेच काही रिक्षा चालकांनी तर आपल्या रिक्षात ही गुढी उभी केली होती. या गुढी उभी केलेल्या रिक्षा सर्वांचेच लक्ष वेधुन घेत होत्या.

Related Stories

आर आर आबांचे सुपुत्र व बंधु कोरोना पॉझिटिव्ह

Shankar_P

जि.प. सीईओंची तडकाफडकी बदली

Patil_p

सातारा : अतिमहत्त्वाच्या कामासाठीच नागरिकांनी कार्यालयात यावे

Shankar_P

वाई शहरात व्यापारी महासंघाकडून सॅनिटायझर फवारणी

Patil_p

दीडशे ग्रामपंचायतींवर प्रशासक राज येणार

triratna

रक्तपेढ्यांच्या मनमानीला बसणार चाप

datta jadhav
error: Content is protected !!