तरुण भारत

लसीकरणानंतर सेल्फीची क्रेझ

सर्वच वयोगटातील नागरिक सेल्फी काढुन घेण्यासाठी उत्सुक

प्रतिनिधी/ सातारा

Advertisements

 कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारतर्फे विविध रूग्णालयात लसीकरण करण्यात येत आहे. सध्या हे लसीकरण करूण घेण्यासाठी रूग्णालयात नागरिकांची गर्दी ही तितकीच होत आहे. या लसीकरण केंद्राजवळ सदर लसीकरण सुरक्षित असल्याबाबतचे सेल्फी पॉईट ही उभारण्यात आले आहे. सध्या या सल्फी पॉईंटवर सेल्फी घेण्याकरीता गर्दी ही तितकीच होत आहे.

 लसीकरणा नंतर आपण लस घेतली असुन तुम्ही ही लस घ्या, कारण लस पुर्णपणे सुरक्षित आहे. अशा अशयाचा संदेश ही या सेल्फीच्या माध्यमातुन देण्यात येत आहे. सर्वच वयोगटातील नागरिक येथे सल्फी काढुन घेण्यासाठी उत्सुक असल्याचे दिसुन येत आहेत. एकमेकांची मदत घेऊन हे सेल्फी काढले जात आहेत. ‘मी कोविडची लस घेतली आहे’, ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’, ‘लस पुर्णपणे सुरक्षित आहे’ असे संदेश या सेल्फी पॉईंटच्या ठिकाणी देण्यात आले आहेत.

 गेल्या काही दिवसांपासुन जिल्हा रूग्णालयात लसीकरण करून घेण्याकरीता नागरिकांची गर्दी ओसंडून वाहत आहे. सध्या कोरोणा रूग्णसंख्येत पुन्हा वाढ होताना दिसुन येत त्यामुळे सुरक्षिततेच्या दृष्टीने 45 वयोगटाच्या पुढील सर्वच नागरिकांनी लसीकरण करून घेण्याकरीता एकच गर्दी केली आहे. ज्याप्रमाणे लसीकरणासाठी गर्दी होत आहे. तितकीच काहीशी गर्दी ही येथे सेल्फी कढुन घेण्याकरीता होत आहे.

 प्रत्येकांना येथे लसीकरणास आल्यावर सल्फीकाढुन घेण्याचा मोह काही आवरत नाही. सेल्फी काढुन तो आपल्या फेसबुक, वॉटसऍप व इन्स्टा सारख्या ऍप वर अपलोड ही केले जातात. तसेच त्याला किती लाईक मिळतात याची उत्सुकतेने पहाणी वेळोवेळी तितकीच केली जात आहे. तसेच काहींनीतर लसीकरणाची आठवण आपल्या सोबत रहावी याकरीता येथे काढलेला फोटो, सेल्फी आपण जपुन ठेवणार असल्याचे ही सांगण्यात येत आहे.

Related Stories

खबरदारी म्हणून स्थलांतराची तयारी!

triratna

लॉकडाऊन नियमांचा भंग; सोलापूर जिल्ह्यात १ कोटी ८४ लाखांचा दंड वसूल

Shankar_P

पालिकेने लावलेल्या झाडांचे वाटोळे

Patil_p

सातारा : नगराध्यक्षा माधवी कदम यांनी केली विकास कामांची पाहणी

datta jadhav

महाराष्ट्रात दिवसभरात 5,902 नवे कोरोना रुग्ण; 156 मृत्यू

pradnya p

वाहतुकीचा प्रश्न मिटविण्यात यशस्वी झालो : माजी आमदार चंद्रदीप नरके

triratna
error: Content is protected !!