तरुण भारत

फुस लावून पळवलेल्या अल्पवयीन मुलीची पोलिसांकडून सुटका

रेल्वे- ग्रामीण पोलिसांची संयुक्त कामगिरी

प्रतिनिधी/ रत्नागिरी

Advertisements

केरळमधून फुस लावून पळवून नेलेल्या 13 वर्षीय मुलीला रत्नागिरीत रेल्वेमधून ताब्यात घेण्यात आल़े रेल्वे सुरक्षा बल व रत्नागिरी ग्रामीण पोलिसांनी संयुक्तरित्या ही कामगिरी केल़ी यासाठी सुमारे 20 मिनिटे रेल्व रत्नागिरी स्थानकावर  थांबवण्यात आली होत़ी पोलिसांकडून रेल्वेचा कानाकोपरा तपासल्यानंतर रेल्वच्या शौचालयामध्ये ही मुलगी सापडल़ी 

 दरम्यान मुलीसोबत असलेला तिचा प्रियकर मात्र पोलिसांच्या हातून निसटून जाण्यात यशस्वी झाल़ा रेल्वे सुरक्षा बल रत्नागिरी यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, केरळ राज्यातील कन्नूर येथून 13 वर्षीय मुलगी बेपत्ता झाल्याची नोंद कन्नूर पोलीस स्टेशन केरळ येथे करण्यात आली होत़ी ही मुलगी विकी नावाचा आपला प्रियकर व 4 जणांसोबत एर्नाकुलम ट्रेन नंबर 06338 ने राजस्थानकडे जात असल्याची गुप्त माहिती कन्नूर पोलिसांकडून रेल्वे सुरक्षा बलाला देण्यात आल़ी

 रत्नागिरी रेल्वे सुरक्षा बलाचे निरीक्षक अजित मधाळे यांनी मुलीला ताब्यात घेण्यासाठी रत्नागिरी ग्रामीण पोलिसांना कळविल़े 12 एप्रिल 2021 रोजी दुपारी 3 वाजता एर्नाकुलम ही रेल्वे  रत्नागिरी रेल्वेस्थानकात आल़ी यावेळी रेल्वे पोलीस व रत्नागिरी ग्रामीण पोलिसांच्या पथकाने रेल्वेची झाडाझडती घेण्यास सुरूवात केल़ी ट्रेनच्या प्रत्येक डब्याची 2 ते 3 वेळेस तपासणी करण्यात आल़ी या ट्रेनमध्ये अपहृत मुलगी व तिच्यासोबत असणाऱयांपैकी कोणीही सापडले नाही. दरम्यान निरीक्षक अजित मधाळे यांना संशय आल्याने त्यांनी सहाय्यक यातायात प्रबंधक व स्टेशन मास्तर रत्नागिरी यांनी रेल्वे आणखी थोडा वेळ थांबवावी, अशी विनंती केल़ी यानंतर प्रत्येक डब्यात अपहृत अल्पवयीन मुलीचा फोटो इतर प्रवाशांना दाखवला असता त्यापैकी एका महिला प्रवाशाने त्या मुलीस ओळखले व सांगितले की, तिला प्रवासाच्या दरम्यान पाहिले आहे. त्यानंतर त्या डब्याची पूर्ण झाडाझडती पोलिसांनी घेतल़ी

 शिताफीने अपहृत मुलीला पकडले

यावेळी या डब्याच्या उजव्या बाजूचे शौचालय बंद असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आल़े आवाज दिल्यानंतरही शौचालयाचा दरवाजा उघडला जात नव्हत़ा  जाणीवपूर्वक कोणीतरी आतून दरवाजा उघडत नसल्याचे लक्षात येताच पोलिसांचा संशय बळावल़ा त्यानंतर रेल्वे सुरक्षा बल व ग्रामीण पोलीस रत्नागिरी यांनी मोठय़ा शिताफीने शौचालयाचा दरवाजा उघडल़ा यावेळी आतमध्ये कन्नूर येथून अपहृत मुलगी आढळली.

  या मुलीकडे पोलिसांकडून चौकशी करण्यात आली असता रेल्वे सुरक्षा बल निरीक्षक अजित मधाळे यांनी त्या मुलीकडे चौकशी केल़ी तिचा मित्र विकी हा तिला लग्नाचे आमिष दाखवून रेल्वेमधून राजस्थानला घेऊन जात असल्याची माहिती समोर आल़ी रेल्वेमध्ये केवळ ही मुलगीच सापडली, परंतु विकी नावाचा मुलगा आढळून आला नाह़ी तसेच त्या मुलीसोबत जे-जे लोकं होते ते त्यांच्या स्वेच्छेने रत्नागिरीमध्ये उतरले असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आह़े सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्या अल्पवयीन मुलीस ग्रामीण पोलीस स्टेशन यांच्या पुढील कार्यवाहीसाठी स्वाधीन करण्यात आले. तसेच कन्नूर पोलीस स्टेशनला कळविण्यात आले.

 या संयुक्त कार्यवाहीत रेल्वे सुरक्षा बल निरीक्षक रत्नागिरीचे अजित मधाळे, उपनिरीक्षक प्रतिभा साळुंखे, सहाय्यक उपनिरीक्षक आर. एस. खांडेकर, प्रधान आरक्षक दीपक टिंगरे, आरक्षक पांडुरंग उप्पलवाड व ग्रामीण पोलीस स्टेशनचे निरीक्षक विनित चौधरी, पोलीस नाईक संदीप काशिद, वैभव मोरे, सुजाता रेवाळे, अमिता पाटील, सुदेश शिंदे यांचा समावेश होत़ा  

Related Stories

कला, वाणिज्य अंतिम परीक्षांचा पुन्हा गोंधळ

Patil_p

दापोलीतील 65 वर्षीय वृद्धाचा कोरोनामुळे मृत्यू

Patil_p

पालकमंत्र्यांच्या मुंबईतील बैठकीला 22 अधिकाऱयांची दांडी!

Patil_p

मार्गताम्हानेत जुगार अड्ड्यावर छापा, पाच जणांवर गुन्हा दाखल

triratna

गावातील रस्त्यांसाठीही मुबलक भरपाई मिळावी

NIKHIL_N

गाडय़ा सुरू झाल्या की निघून जाऊ, पण तोवर..!

NIKHIL_N
error: Content is protected !!