तरुण भारत

मानस स्पोर्ट्सने पटकावला चैतन्य स्पोर्ट्स चषक

क्रीडा प्रतिनिधी / बेळगाव

चैतन्य स्पोर्ट्स फौंडेशन व खन्नूर स्पोर्ट्स अकादमी हुबळी यांच्या संयुक्त विद्यमाने निमंत्रितांच्या अंतरऍकॅडमी महिला फुटबॉल स्पर्धेत बेळगावच्या मानस स्पोर्ट्स फौंडेशन महिला संघाने जेनेसीस हुबळी संघाचा पराभव करून अजिंक्मयपद पटकाविले.

Advertisements

या स्पर्धेत एकूण आठ जिल्हय़ाच्या क्लब्सनी भाग घेतला होता. पहिल्या सामन्यात मानस स्पोर्ट्स संघाने हुबळी फुटबॉल क्लब संघाचा 2-0, दुसऱया सामन्यात कलघटगी अकादमी संघाचा 6-0, तिसऱया सामन्यात ब्लॅक पँथर धारवाड संघाचा 3-0 असा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश मिळविला. अंतिम सामन्यात मानस स्पोर्ट्स संघाने जेनेसीस हुबळी संघाचा 5-0 असा पराभव करून जेतेपद पटकावले. पहिल्या सत्रात सातव्या मिनिटाला तन्वी गावडेने तर 17 व्या मिनिटाला धनश्री कदमने गोल नोंदवले.

दुसऱया सत्रात 32 व्या मिनिटाला सायली देसाईने, 37 व्या मिनिटाला सुमेधा पाटीलने तर 40 व्या मिनिटाला प्रेरणा बनिया हिने गोल करून 5-0 अशी भक्कम आघाडी मिळविली. जेनेसीस संघाला मात्र अखेरपर्यंत गोल करता आला नाही. विजयी संघात सायली देसाई, सुमेधा पाटील, तन्वी गावडे, धनश्री कदम, अपर्णा हरेर, प्रेरणा बनिया, अलिशा बोरगस, तन्वी पाटील, मंजुशा पाटील, अवनी चौगुले, तनिशा सालगुडे, हर्षदा जी., लक्ष्मी कांबळे या खेळाडूंचा समावेश आहे. सामन्यानंतर प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते विजेत्या मानस स्पोर्ट्स व उपविजेत्या जेनेसीस हुबळी संघाला चषक, प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. या संघाला प्रशिक्षक मानस नायक, कौशिक पाटील, विशाल कांबळे यांचे मार्गदर्शन तर संघटनेचे सचिव सलिम किल्लेदार यांचे प्रोत्साहन लाभत आहे.

Related Stories

जुने पथदीप बनले शोभेचे, नवे बसविण्याचा सपाटा

Amit Kulkarni

बेळगाव जिह्यात मंगळवारी 27 जण कोरोना पॉझिटिव्ह

Rohan_P

रस्ता बनला पार्किंग तळ, वाहनधारकांची तारांबळ

Patil_p

ग्राहकांचे पैसे लाटणाऱया मीटर रिडरचे निलंबन

Patil_p

वडगाव मंगाईदेवी आवारात रेणुकादेवी प्रतिकृती दर्शन सोहळा

Patil_p

भुतरामहट्टीजवळ अपघातात युवक ठार

Patil_p
error: Content is protected !!