तरुण भारत

काहेरमध्ये ‘केअरिंग टू ब्लूम’विषयावर कार्यशाळा

प्रतिनिधी / बेळगाव

काहेर विद्यापीठाच्या जे. एन. मेडिकल कॉलेजतर्फे दि. 10 व 11 एप्रिल रोजी ‘केअरिंग टू ब्लूम’ या विषयावर व्हर्च्युअल पद्धतीने निरंतर वैद्यकीय शिक्षण कार्यशाळा पार पाडली. कार्यशाळेचे उद्घाटन कुलगुरु डॉ. विवेक सावजी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते म्हणाले, आरोग्य क्षेत्रात आणि विशेषतः कोरोनाकाळात स्वतःला ‘अपडेट’ ठेवण्यासाठी ही कार्यशाळा उपयुक्त ठरणार आहे.

Advertisements

अध्यक्षा प्राचार्या डॉ. निरंजना महांतशेट्टी म्हणाल्या, कोरोनाकाळात आरोग्याशी संबंधित अनेक प्रश्नांवर कार्यशाळा घेतल्या. प्रामुख्याने कुपोषण या विषयावर अधिक चर्चा करण्यात आली. सर्व डॉक्टरांनी कार्यशाळेचा लाभ घ्यावा, असेही त्यांनी सांगितले. याच कार्यक्रमात जेएनएमसीचे सायंटीफिक सोसायटी जनरल प्रकाशित करण्यात आले.

या कार्यशाळेत दिल्ली येथील डॉ. पियुष गुप्ता यांनी डॉ. बी. एस. जिरगे स्मृती व्याख्यान दिले. ते म्हणाले, गर्भवतीला सकस आहार मिळणे आवश्यक आहे. गर्भधारणा झाल्यापासून प्रारंभीचे एक हजार दिवस हे गर्भाच्या विकासासाठी महत्त्वाचे असतात. बाळाला मातेचे दूध मिळणे त्याच्या वाढीसाठी आवश्यक आहे. त्यामुळे मातेच्या आहारावर अधिक लक्ष दिले पाहिजे.

यानंतर ‘मेटाबॉलिक सिंड्रोम’ या विषयावर चर्चासत्र झाले. भारत आणि परदेशातून 800 हून अधिक प्रतिनिधींनी या कार्यशाळेत सहभाग घेतला. सीएमईचे चेअरमन डॉ. महांतेश पाटील यांनी स्वागत केले. डॉ. भावना कोप्पद व भाग्यज्योती खनगावी यांनी सूत्रसंचालन केले. याप्रसंगी डॉ. व्ही. ए. कोठीवाले, डॉ. व्ही. डी. पाटील, डॉ. राजेश पोवार, डॉ. व्ही. ए. पट्टणशेट्टी उपस्थित होते.

Related Stories

हवाई दलाच्या प्रशिक्षणार्थी एअरमन्सचा दीक्षांत समारंभ

Amit Kulkarni

जिल्ह्यात आता 144 कलम; पाचपेक्षा अधिक राहिल्यास फौजदारी गुन्हा

tarunbharat

बेळगाव जिल्ह्यात कोरोनामुळे दोघांचा मृत्यू

Prasad_P

रेल्वेच्या धडकेत अनोळखी महिला ठार

Patil_p

पालिका निवडणुकीवरील निवाडा राखून

Amit Kulkarni

नागेनहट्टी येथील उमेदवार एक मताने विजयी

Patil_p
error: Content is protected !!