तरुण भारत

ज्योतिर्लिंग मंदिरात ज्योतिबाची विशेष पूजा

बेळगाव : गुढीपाडव्यानिमित्त येथील नार्वेकर गल्लीतील ज्योतिर्लिंग देवस्थान मंदिरात ज्योतिबाची विशेष पूजा बांधण्यात आली होती. सकाळी 7 वाजता अभिषेक करण्यात आला. त्यानंतर पालखीचे पूजन करण्यात आले. आरती करून पुरणपोळीचा नैवेद्य दाखविण्यात आला. चैत्र शुद्ध सप्तमीला यज्ञकुंडातून आठ वर्षाचा बटुरुपात ज्योतिबा प्रकट झाला होता. त्यामुळे सोमवार दि. 19 एप्रिल रोजी मंदिरात ज्योतिर्लिंग प्रकट दिन साजरा करण्यात येणार आहे.

या दिवशी मंदिरात सकाळी 7 वाजता अभिषेक, 9 वाजता होम करण्यात येणार असून 108 केदार कवचचा जपही करण्यात येणार असल्याची माहिती पुजारी ज्ञानेश्वर अष्टेकर यांनी दिली. भक्तांनी यावेळी प्रसादाचा लाभ घ्यावा, असे कळविण्यात आले आहे.

Advertisements

Related Stories

धारवाड झोन सेकंड डिव्हीजन क्रिकेट स्पर्धा आजपासून

Amit Kulkarni

हृदयाला भिडणाऱया साहित्याची गरज

Amit Kulkarni

खानापूर शिवप्रतिष्ठानतर्फे भीमगड किल्ल्यावर गडकोट मोहीम

Amit Kulkarni

बेळगावच्या श्रेया पोटेची क्रिकेट स्पर्धेत चमकदार कामगिरी

Amit Kulkarni

कोटपा कायद्याच्या अंमलबजावणीसाठी पोलिसांना प्रशिक्षण

Omkar B

निवडणूक कर्तव्यात कसूर केल्यास कारवाई

Patil_p
error: Content is protected !!