तरुण भारत

अनधिकृत कटआऊट्सकडे मनपाचे दुर्लक्ष

180 हून अधिक जाहिरात फलक : जाहिरात फलकांसाठी पथदीप-विद्युत खांब यांचा उपयोग

प्रतिनिधी / बेळगाव

Advertisements

शहरात जाहिरात फलक लावण्यावर बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे रस्त्याशेजारी व विविध चौकांमध्ये मोठमोठे होर्डिंग आणि विविध दुकानांवर लागणारे कटआऊट हद्दपार झाले आहेत. मात्र, काही शैक्षणिक संस्था आणि कोचिंग क्लासेसच्या जाहिरात कटआऊट विद्युतखांब आणि पथदीप खांबांवर झळकत आहेत. त्यामुळे हे फलक लावण्यास महापालिकेने परवानगी दिली आहे का? असा मुद्दा उपस्थित करण्यात येत आहे.

महापालिका व्याप्तीमध्ये 180 हून अधिक जाहिरात फलक आहेत. या माध्यमातून महापालिकेला वर्षाला लाखोंचे उत्पन्न मिळते. मात्र, राज्य शासनाने फ्लेक्सचे जाहिरात फलक लावण्यावर बंदी घातली आहे. बंदीची अंमलबजावणी काटेकोरपणे करण्याचा आदेश बजावला आहे.

 त्यामुळे महापालिकेनेच अनधिकृत जाहिरात फलक हटविण्याची कारवाई यापूर्वी अनेक वेळा केली होती. त्यामुळे शहर जाहिरात फलकमुक्त बनले आहे. केवळ कॅन्टोन्मेंट हद्दीमध्ये जाहिरात फलक लावण्यात येत आहेत.

निविदा प्रक्रियेला थंडा प्रतिसाद

जाहिरात फलक लावण्यासाठी महापालिकेने विविध अटी घालून निविदा मागविल्या होत्या. मात्र, शासनाच्या धोरणामुळे जाहिरात फलक लावण्यासाठी निविदा प्रक्रियेत कोणीच भाग घेत नाही.

शहर व्याप्तीतील फलक हद्दपार

त्यामुळे निविदा प्रक्रियेला मागील दोन वर्षांपासून थंडा प्रतिसाद मिळाला आहे. जाहिरात फलक लावणाऱयांवर कारवाई करण्याचा बडगा महापालिकेकडून राबविण्यात येत आहे. त्यामुळे शहर व्याप्तीमधील जाहिरात फलक हद्दपार झाले आहेत.

शैक्षणिक संस्था-कोचिंग क्लासेसचे फलकच अधिक

काही शैक्षणिक संस्थांचे जाहिरात फलक शहरातील विविध रस्त्यांवर झळकत आहेत. कोचिंग क्लासेस चालविणाऱयांनी कटआऊट्सद्वारे जाहिरात करण्याचा प्रकार चालविला आहे. कटआऊट लावण्यासाठी विद्युत खांब तसेच पथदिपांच्या खांबांचा वापर करण्यात येत असल्याचे निदर्शनास आले आहे. कटआऊट लावण्यावर बंदी असतानाही काहींनी कटआऊट लावण्याचा प्रकार चालविला आहे. टिळकवाडी, शहापूर, भाग्यनगर, अनगोळ अशा विविध भागात कोचिंग क्लासेसच्या जाहिराती झळकत आहेत. त्यामुळे या जाहिरातदारांना परवानगी कुणी दिली, असा मुद्दा उपस्थित करण्यात येत आहे.

अनधिकृत जाहिरातींकडे महापालिकेने का दुर्लक्ष केले आहे, अशी विचारणा करण्यात येत आहे. याबाबत महापालिकेने लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.

Related Stories

स्व-खर्चाने केली रोगप्रतिबंधक औषध फवारणी

Patil_p

ट्रक्टर उलटल्याने 15 जण जखमी

Patil_p

किसान रेल्वेतून 56 टन कृषी उत्पादनाची वाहतूक

Patil_p

दत्त जयंती श्रद्धेने साजरी

Patil_p

अश्लील हावभाव-जीवे मारण्याची धमकी देणाऱया तिघांना कारावास

Patil_p

कोरोना महामारीमुळे मुस्लीम बांधवांचे रमजानमधील नमाज पठण घरातच

Patil_p
error: Content is protected !!