तरुण भारत

मफतलाल फॅमिली शॉप ‘गौतम’चा वर्धापन दिन साजरा

प्रतिनिधी / बेळगाव

हंस टॉकीज रोडवरील श्रीपाल कॉम्प्लेक्स येथील मफतलाल फॅमिली शॉप ‘गौतम’चा 51 वा वर्धापन दिन गुढीपाडव्यादिवशी साजरा करण्यात आला. या शोरूमची स्थापना उमेदमलजी, मोहनलालजी, घेवरचंदजी या खोडा बंधूंनी केली. घेवरचंदजी खोडा 1970 पासून आजतागायत शोरूमचा कार्यभार सांभाळत असून, आता त्यांचे चिरंजीव कमलेश व हितेश यांचे सहकार्य लाभत आहे.

Advertisements

सदर शोरूमला मफतलालचे अध्यक्ष अरविंदभाई मफतलाल यांच्यासह उपाध्यक्ष व विभागीय व्यवस्थापक आदी वरि÷ अधिकाऱयांनी भेट देऊन प्रशंसा केली आहे. या शोरूमला ‘ट्रान्स वर्ल्ड टेड फेअर सर्व्हिस दिल्ली फॉर फेअर डिलिंग ईन टेक्स्टाईल टेड’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. धारवाड, विजापूर, कारवार येथे मफतलाल शोरूम नसल्याने तेथील ग्राहकसुद्धा बेळगावलाच येऊन खरेदी करतात. बेळगावसह कोकण आणि गोवा येथील ग्राहक प्रारंभापासूनच मफतलाल येथे खरेदीस येत असून, आजही ही परंपरा कायम
आहे.

पाडव्याच्या शुभमुहूर्तावर घेवरचंदजी खोडा, कमलेश, हितेश व कुटुंबीयांनी कर्मचाऱयांसमवेत केक कापून वर्धापन दिन साजरा केला.

Related Stories

रोटरी क्लब-जनसेवा ट्रस्टतर्फे 2000 जणांना लसीकरण

Amit Kulkarni

सेल्फी काढताना ब्रिजवरून पडून युवक-युवती ठार

Amit Kulkarni

हलग्याजवळ अपघातात गवंडी कामगाराचा मृत्यू

Patil_p

शाळांसाठी मार्गदर्शक प्रणाली तयार करण्याच्या सूचना

Omkar B

दिवाळीच्या खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड

Patil_p

माजी विद्यार्थ्यांकडून येळ्ळूर मराठी शाळेत सुसज्ज ग्रंथालय

Amit Kulkarni
error: Content is protected !!