तरुण भारत

भांदूर गल्ली मरगाई ग्रुपतर्फे गुढीपाडव्यानिमित्त शोभायात्रा

प्रतिनिधी / बेळगाव

दरवषीप्रमाणे यावषीही गुढीपाडव्यानिमित्त येथील भांदूर गल्ली मरगाई ग्रुपच्यावतीने शोभायात्रा काढण्यात आली. या शोभायात्रेला भांदूर गल्ली मरगाई मंदिरापासून सुरुवात होऊन ताशिलदार गल्ली सोमनाथ मंदिर, त्यानंतर फोर्ट रोडमार्गे पुन्हा भांदूर गल्ली मरगाई मंदिर येथे सांगता करण्यात आली. प्रारंभी सकाळी 7 वाजता मरगाई मंदिरात महाआरती करून शोभायात्रेला प्रारंभ झाला.

Advertisements

  मागील 7 वर्षांपासून भांदूर गल्ली आणि ताशिलदार गल्ली यांच्यावतीने ही शोभायात्रा काढण्यात येते. काही नागरिक प्रथेप्रमाणे गुढीपाडव्याला आपल्या घरासमोर गुढी उभारतात. मात्र, काही नागरिक गुढी उभारत नसल्याने त्यांना गुढीचे दर्शन घेता यावे यासाठी या शोभायात्रेत पालखीत गणेशमूर्ती आणि छोटी गुढी उभारण्यात आली होती. यावेळी सर्वांनी गुढीचे दर्शन घेऊन आपल्या मनोकामना पूर्ण होऊ देत, अशी प्रार्थना केली आणि नूतन वर्षाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या.

 कोरोनाकाळात प्रमुख भूमिका बजावलेल्या पोलीस, डॉक्टर आणि सफाई कर्मचारी यांचा पोशाख बालचमूने या शोभायात्रेत परिधान केला होता. त्यामुळे ही शोभायात्रा आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली होती. शोभायात्रेत महिला, युवक-युवती व बालचमू सहभागी झाले होते.

Related Stories

बेकिनकेरे-गोजगा रस्त्याकडे साफ दुर्लक्ष

Omkar B

घटप्रभा- चिकोडी विभागात रेल्वेची गती वाढणार

Patil_p

निजामुद्दीन कार्यक्रमाला गेलेले अद्यापही बाहेरच

Patil_p

परवानगीअभावी डॉल्बीचालक अद्यापही अडचणीत

Omkar B

केएलएस स्कूलकडे इस्लामिया चषक

Patil_p

एनसीसी छात्रांना सरकारी नोकरीमध्ये आरक्षण द्या

Patil_p
error: Content is protected !!