तरुण भारत

शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचा अनोखा उपक्रम

शिवरायांना वंदन करून नववर्षाची सुरुवात

प्रतिनिधी / बेळगाव

Advertisements

शिवप्रतिष्ठानतर्फे मंगळवारी छत्रपती शिवाजी उद्यान येथे मोठय़ा उत्साहात गुढीपाडवा साजरा करण्यात आला. मराठी वर्षारंभ होत असल्याने सर्व शिवभक्तांना शिवप्रतिष्ठानतर्फे शुभेच्छा देण्यात आल्या. गुढी उभारून पारंपरिक पद्धतीने गुढीपाडवा साजरा करण्यात आला. जिल्हाध्यक्ष किरण गावडे यांच्या हस्ते शिवरायांच्या मूर्तीचे पूजन करण्यात आले.

यावेळी बोलताना किरण गावडे म्हणाले, एकाच मूर्तिकाराकडे बेळगाव व रायगड येथे बसविण्यात येणारी शिवमूर्ती तयार करण्यासाठी देण्यात आली होती. काही कारणाने रायगडावर बसविण्यात येणारी मूर्ती न बसविता त्या ठिकाणी बेळगावसाठी तयार केलेली मूर्ती बसविण्यात आली. रायगडसाठी तयार केलेली मूर्ती बेळगावमध्ये बसविण्यात आली आहे. त्यामुळे आपण शिवरायांच्या समोरच गुढी उभारून नव्या वर्षाची सुरुवात करत असल्याच्या भावना त्यांनी व्यक्त केल्या.

यावेळी शहर कार्यवाह विश्वनाथ पाटील, शहर प्रमुख अजित जाधव, विभाग प्रमुख पुंडलिक चव्हाण, किरण बडवाण्णाचे, अंकुश केसरकर, विजय कुंटे, गिरीष कणेरी, आनंद कांबळे, ओंकार पुजारी, मारुती पाटील, प्रमोद कंग्राळकर, अजय सुगणे, रोहित मुळे, केतन नायकर, सोमेश बेनके, संदीप जाधव, सुशांत तरळे, गजानन निलजकर, अतुल केसरकर, मजुकर मामा यांच्यासह महिला व बालचमू उपस्थित होते.

Related Stories

राज्यात प्रतिदिनी 400 टन भाजीची आवश्यकता- कृषी मंत्री बाबू कवळेकर

Omkar B

तेजीमागचे रहस्य काय?

Omkar B

राष्ट्रीयकृत बँक कर्मचाऱयांचे आझाद मैदानावर धरणे

Amit Kulkarni

मडगाव रवींद्र भवनमध्ये आत्ता स्वामी विवेकानंद केंद्र

Amit Kulkarni

वीजमंत्री नीलेश काब्राल यांच्यावर वाढदिनानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव

Patil_p

वेतन देण्याच्या मागणीसाठी मुरगाव पालिका कामगारांचे काम बंद, स्वच्छतेचा गंभीर प्रश्न निर्माण होण्याची शक्यता

Omkar B
error: Content is protected !!