तरुण भारत

भाजपचा सौंदत्ती तालुक्मयात रॅलीद्वारे जोरदार प्रचार

मोटारसायकल रॅली काढून केले शक्तिप्रदर्शन

प्रतिनिधी / बेळगाव

Advertisements

सौंदत्ती तालुक्मयामध्ये भाजपने जोरदार प्रचार केला असून तालुक्मयातील विविध गावांमध्ये मोटारसायकल रॅली काढून जोरदार शक्तिप्रदर्शन भाजपने केले आहे. गेल्या दहा-बारा दिवसांमध्ये जोरदार प्रचार भाजपने केला आहे. सौंदत्तीसह रामदुर्ग, गोकाक, बैलहोंगल या परिसरात प्रचार केला. त्यानंतर शेवटच्या टप्प्यात आता मोटारसायकल रॅली काढून नेतेमंडळी मतदारांना आवाहन करताना दिसत आहे.

लोकसभा पोटनिवडणुकीसाठी भाजपतर्फे मंगला अंगडी यांना उमेदवारी देण्यात आली. दिवंगत केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नीला उमेदवारी दिल्यामुळे भाजपचे सर्वच दिग्गज त्यांना विजयी करण्यासाठी गेल्या महिन्याभरापासून बेळगाव परिसरातच ठाण मांडून आहेत. घरोघरी जाऊन मतदारांच्या गाठीभेटी घेऊन त्यानंतर कॉर्नर सभा घेण्यात आल्या आहेत.

भाजपच्या उमेदवार मंगला अंगडी यांच्याबरोबरच भाजपच्या नेत्या शोभा करंदलाजे, उज्ज्वला बडवाण्णाचे यांच्यासह इतर कार्यकर्ते उपस्थित होते. सौंदत्ती तालुक्मयात जोरदार रॅली काढली होती. त्याला मतदारांनीही उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. काही ठिकाणी कॉर्नर सभाही घेण्यात आल्या. त्यामध्ये काँग्रेसवर टीका करून जनतेने भाजपला मतदान करावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

Related Stories

विविध मागण्यांसाठी शेतकऱयांची निदर्शने

Patil_p

केदनूरमधील शेतकऱयाची आत्महत्या

Patil_p

बेळगाव जिल्हय़ात आणखी 5 जणांना लागण

Patil_p

जेएनएमसीतर्फे फिट इंडिया रन मोहीम

Patil_p

सरत्या वर्षाला बाय बाय!

Patil_p

मराठा मंदिरतर्फे पंतप्रधान निधीला लाखाचा निधी

Patil_p
error: Content is protected !!