तरुण भारत

शुभम शेळके यांच्या प्रचारासाठी संजय राऊत आज बेळगावमध्ये

प्रतिनिधी / बेळगाव

मध्यवर्ती म. ए. समितीचे उमेदवार शुभम शेळके यांच्या प्रचारासाठी शिवसेना नेते व राज्यसभा सदस्य संजय राऊत बुधवार दि. 14 रोजी बेळगावमध्ये दाखल होणार आहेत. शहापूर येथे होणाऱया पदयात्रेसोबतच संयुक्त महाराष्ट्र चौक येथे खासदार संजय राऊत यांची जाहीर सभा होणार आहे.

Advertisements

बुधवारी दुपारी 1.45 वा. मुंबई विमानतळावरून ते निघणार आहेत. 2.45 वा. सांबरा विमानतळ येथे दाखल होणार आहेत. दुपारी 3 वा. मुतगा येथील शिवमूर्तीला पुष्पहार अर्पण करणार आहेत. त्यानंतर एस. सी. मोटर्स येथे त्यांचे भव्य स्वागत होणार आहे. सायंकाळी 4.30 वा. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळय़ाला पुष्पहार अर्पण करणार आहेत.

सायंकाळी 5 वाजता शिवाजी उद्यान येथून ते पदयात्रेत सहभागी होतील. ही पदयात्रा शनिमंदिरमार्गे हेमू कलानी चौक येथून संयुक्त महाराष्ट्र चौकात पोहोचणार आहे. यानंतर सायंकाळी 7 वाजता त्यांची जाहीर सभा होणार असल्याचे कळविण्यात आले आहे.

Related Stories

भारतात अडकलेले नागरिक इंडोनेशियाला रवाना

Omkar B

खानापूर तालुका म.ए.समिती ग्रा.पं.सदस्यांचा सत्कार करणार

Patil_p

प्रवासी नसल्याने बसफेऱयाही होताहेत कमी

Patil_p

पोटनिवडणुकीसाठी सेक्टर अधिकाऱयांना प्रशिक्षण

Omkar B

पारंपरिक पद्धतीने होळी-लोटांगण विधी

Amit Kulkarni

जिव्हाळा परिवारतर्फे विद्यार्थिनींना मदत

Amit Kulkarni
error: Content is protected !!