तरुण भारत

कोरोना रुग्णांचे मंगळवारी पुन्हा शतक

प्रतिनिधी / बेळगाव

कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. मंगळवारी तर तब्बल 101 रुग्ण आढळले आहेत. त्यामध्ये तालुक्मयामधील 59 रुग्णांचा समावेश आहे. रुग्णांची संख्या अशीच वाढत राहिल्यास पुन्हा मोठा धोका निर्माण होण्याची भीती व्यक्त होत आहे.

Advertisements

गेल्या पंधरा दिवसांमध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. हा संसर्ग झपाटय़ाने पसरत आहे. महाराष्ट्रामध्ये मोठय़ा प्रमाणात रुग्णसंख्या आढळत असताना आता बेळगाव जिल्हय़ातही रुग्णांची संख्या वाढत आहे. 

मंगळवारी देसूर, गणेशपूर, लक्ष्मीनगर, सांबरा, अमाननगर, अनगोळ, अंजनेयनगर, भडकल गल्ली, चिदंबरनगर, गुरुप्रसाद कॉलनी, जाधवनगर, जयभवानीनगर, काकतीवेस, कंकणवाडी, लक्ष्मीटेक, महांतेशनगर, सदाशिवनगर, राणी चन्नम्मानगर, खासबाग, शहापूर, टिळकवाडी, वडगाव या परिसरासह इतर ठिकाणी पॉझिटिक्ह रुग्ण आढळले आहेत.

शहरामध्ये रुग्णसंख्या झपाटय़ाने वाढत आहे. मात्र अजूनही याबाबत नागरिकांमध्ये गांभीर्य दिसत नाही. यामुळे आरोग्य खात्याकडून वारंवार कोरोना नियमांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांवर  विविध हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

Related Stories

बेकायदा मांस वाहतूक करणारे वाहन ताब्यात

Rohan_P

भोवी गल्लीतील कार्तिकी स्वामी मंदिरात रविवारी विविध कार्यक्रम

Patil_p

कर्नाटक : लक्षणे नसलेल्या पण पॉझिटिव्ह असलेल्या विद्यार्थ्यांना केसीईटी देण्यास परवानगी

triratna

बेकिनकेरे परिसरात वन्यप्राण्यांचा हैदोस : पिकांचे मोठे नुकसान

Omkar B

‘निजामुद्दीन कनेक्शन’मुळे जिल्हय़ात सतर्कता

Rohan_P

कोरोना रुग्णसंख्येत झपाटय़ाने वाढ

Amit Kulkarni
error: Content is protected !!