तरुण भारत

पाडव्या दिवशी सोने खरेदीचा उच्चांक

रात्री उशिरापर्यंत सोने खरेदीला गर्दी

प्रतिनिधी / कोल्हापूर

Advertisements

साडेतीन मुहूर्तापैकी एक शुभ मुहूर्त असलेल्या, गुढी पाडव्यादिवशी सोने खरेदीने मोठा उच्चांक करत मंगळवारी कोट्यावधी रूपयांची उलाढाल झाली. लॉकडाऊनच्या भीतीने बुलियनकडून सोन्याचा पुरवठा न झाल्याने, ऐन सणात सोन्याचा दर वाढून होता. सोन्याचा दर वाढून देखील रात्री उशिरापर्यंत सोने खरेदीला गर्दी होती.

विकेंड लॉकडाऊननंतर अवघ्या दोन दिवसांवर आलेला गुढी पाडवा साजरा होणार का, अशी भीती होती. कोरोनामुळे लोक बाहेर पडतील का, अशी शंका होती. पण सोमवारपासून बाजारपेठ खुली झाल्याने, खरेदीसाठी लोकांचा लोंढा रस्त्यावर आला. मंगळवारी गुढी पाडव्यादिवशी सोने खरेदीचा उच्चांक झाला.

दिवसभरात सोन्याचा दर चढाच होता. दर वाढूनही लोकांच्या खरेदीचा ओघ वाढतच राहिला. तेरा दिवसात सोने दहा ग्रॅममागे 2200 तर चांदी किलोला 2700 रूपयांनी वाढली आहे. आठवडÎात हाच दर अनुक्रमे 1450 व 1800 रूपयांनी वाढला आहे. गेल्या आठवडÎात सोन्याचा प्रती 10 ग्रॅमचा दर 46 हजार 550 रूपये तर चांदीचा किलोचा दर 65 हजार 200 रूपये होता. पाडव्यादिवशी हा दर 48 हजार व 67 हजार रूपये होता. दिवसभरात 10 ग्रॅममागे 700 रूपयांनी सोन्याचा दर वाढला आहे.

मंगळवारी सकाळपासूनच गुजरी, शाहूपुरी स्टेशन रोड, राजारामपुरी येथील सोन्याच्या दुकानामध्ये गर्दी सुरू होती. खरेदीच्या गर्दीमध्ये कोरोना आहे की नाही, याचा लोकानां विसर पडला होता. पाडव्यादिवशी सोने खरेदीला झालेली गर्दी ही तीन वर्षातील उच्चांकी गर्दी व खरेदी झाल्याचे सराफ व्यावसायिक सुभाष गुंदेशा यांनी सांगितले.

लॉकडाऊनच्या भीतीने बुलियनकडून सोन्याचा पुरवठा कमी

लॉकडानच्या भीतीने गेल्या आठवड्या पासून बुलियनकडून सोन्याचा पुरवठा झाला नाही. तर बँकांना सुट्टया असल्याने, बँकाकडूनही सोन्याचा पुरवठा झाला नाही. या कारणामुळे सोन्याच्या दरात वाढ झाल्याची सराफ बाजारातून सांगण्यात आले.

Related Stories

एकरकमी एफआरपीसह १४ टक्के वाढ घेणारच

triratna

केंद्र सरकारच्या आदेशाचे कोल्हापूर महापालिकेला वावडे

triratna

कोल्हापूर जिल्ह्यात दुपारी दोन वाजेपर्यंत २२८ पॉझिटिव्ह

triratna

दहावीचे मूळ गुणपत्रक सोमवारी मिळणार

triratna

शिरोळमधील शासकीय अधिकार्‍याचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह

triratna

महिला बचत गटाच्या माध्यमातून बांधावर खते व बियाणे वाटप

Shankar_P
error: Content is protected !!