तरुण भारत

मुख्यमंत्र्यांनी स्वच्छता कर्मचाऱ्यांना वाटले गणवेश

बेंगळूर/प्रतिनिधी

कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी बुधवारी बेंगळूरमधील स्वच्छता कामगारांना नवीन गणवेश वाटप केले. यावेळी त्यांनी डॉ. बी. आर. आंबेडकर यांच्या १३० व्या जयंतीनिमित्तपुष्पांजली अर्पण करून आदरांजली वाहिली. हा कार्यक्रम विधान सौध समोर पार पडला.

बेंगळूरमधील स्वच्छता कामगारांना बुधवारपासून त्यांच्या कामाच्या प्रकारानुसार नवीन गणवेश देणार आहेत. तसेच त्यांच्या दीर्घकाळ चाललेल्या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी सरकारने कामगारांना योग्य आकाराचे नवीन हातमोजे आणि मुखवटे देण्याचा निर्णयही घेतला आहे.

ओला कचरा गोळा करणार्‍या कामगारांना हिरव्या रंगाचा गणवेश मिळेल, तर कोरडा कचरा गोळा करणार्‍यांना निळा गणवेश दिला जाईल आणि सफाई कामगार यांना तपकिरी गणवेश दिला जाणार आहे. कामगारांना हिवाळ्यातील पोशाख आणि रेनकोट देखील दिले जाणार आहे.

दरम्यान मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा, उपमुख्यमंत्री अश्वनाथनारायण, बीबीएमपी प्रशासक राकेश सिंह आणि बीबीएमपी आयुक्त गौरव गुप्ता यांनीही बी आर आंबेडकर यांची १३० वी जयंती साजरी केली.

Advertisements

Related Stories

निवृत्त पोलिसांनाही मिळणार ओळखपत्रे

Patil_p

कर्नाटक: मुख्यमंत्र्यांचे मंत्रिमंडळ विस्ताराबाबत हाय कमांडकडे बोट

Shankar_P

जिल्हाधिकाऱयांचे ग्रामवास्तव्य रद्द

Amit Kulkarni

माजी मंत्री रमेश जारकिहोळी यांना त्वरित अटक करा

Shankar_P

कारवार-मंगळूर विद्युत रेल्वेची चाचणी यशस्वी

Patil_p

बेंगळूर : परिस्थिती नियंत्रणाबाहेर : मुख्यमंत्री येडियुरप्पा

Shankar_P
error: Content is protected !!