तरुण भारत

खडतर परिस्थितीतून यश मिळवणारा संदेश

लॉन टेनिसपट्टू संदेश कुरळेचा प्रवास थक्क करणारा, वडिलांनी गावाकडे आपल्या जमिनीत केलेलॉन’ तयार

गडहिंग्लज / रोहित ताशिलदार

Advertisements

ग्रामीण भागातील एखाद्या खेळाडूंनी आपली जिद्द, चिकाटी, कष्ट आणि आई-वडिलांचा आधार यांचे सुयोग्य नियोजन केले तर स्वप्नाचे यशात रुपांतर होण्यास फारवेळ लागणार नाही. देशातील ऍथलॅटिक क्रिडा विश्वासात देशांतर्गत ग्रामीण खेडाळूंचा सहभाग दिसतो हे वास्तव आहे. यासाठी फक्त जिद्द, चिकाटी असून चालणार नाही तर आई-वडिलांचा आधार देखील तितकाच महत्वाचा असतो. असाच एक ग्रामीण खेळाडू संदेश दत्तात्रय कुरळे यांनी वैयक्तिक लॉन टेनिस स्पर्धेत यश मिळवत आपल्या खडतर प्रवासातून यशाला गवसणी घातली आहे.

संदेश कुरळे हा मूळचा गडहिंग्लज तालुक्यातील चन्नेकुप्पी या गावचा. दहावीपर्यंत शिक्षण गावात झाले. कुटूंबाचा उदरनिर्वाह चालविण्यासाठी शेतीच्या उत्पन्नाबरोबर वडिलांनी गडहिंग्लजला चहाचा स्टॉल सुरू केला. तेथूनच खरा संदेशचा टेनिस खेळाचा प्रवास सुरू झाला. सुरूवातीस वडिलांनी पाचवीनंतर संदेशला मैदानी खेळ, जलतरण सराव, बुध्दीबळ आदी ऍथलॅटिक खेळाबाबत प्रयोग केला. पण कोणत्याच खेळात तो रमला नाही. कारण ग्रामीण भागातील खेळाडूला फक्त सराव करून चालणार नाही तर विविध पातळीवर स्पर्धेत सहभागी होवून क्षमता ओळखता आली पाहिजे. तरच खेळाडूला सरावाला प्रोत्साहन मिळत असते.

बारावीच्या वर्गात आता शिकत असणाऱया संदेशने शालेय शिक्षणात वैयक्तिक लॉन टेनिस खेळाचा खऱया अर्थाने सराव सुरू केला. लॉन टेनिस खेळाकडे फक्त श्रीमंतांची मुले खेळतात असा ग्रामीण भागात समज आहे. संदेशने सुरूवातीस कोल्हापूर येथे सरावाला सुरूवात केली. आठवडÎातील शनिवार, रविवारी तो कोल्हापुरात प्रशिक्षक हर्षद आणि मलान देसाई यांच्याकडे सराव सुरू केला. वडिलांनी प्रोत्साहन देत त्याच्या हातातील टेनिस रॅकेटला चांगली गती मिळवून दिली. मग सरावासाठी वडिलांनी चक्क शेतातील अडीच गुंठÎात 4 लाख खर्च करून 7 वर्षापुर्वी टेनिस लॉन तयार केली. याठिकाणी सोमवार ते शुक्रवारी सराव घेण्यास सुरूवाती केली. कोल्हापुरातील सराव आणि जिल्हापातळीवरील स्पर्धेतील यश पाहूनच आपला मुलगा याच खेळात पुढे जाणार असल्याचा आशेचा किरण वडिलांना दिसला.

तंत्रशुध्द खेळ, आहार आणि फिटनेस याकडे लक्ष केंद्रीत करून खेळातील विविध नियम, सर्व्हिस आणि क्षमता वाढविण्यास सुरूवाती केली. संदेशचा खेळ पाहून त्याला `लॉग सर्व्हिस संदेश’ असा टोपण नाव देखील सहकाऱयांनी दिली. संधी, साधन आणि सातत्यपणाचा एकोपा करत संदेशने आपली लॉन टेनिसची लढाई सुरू केली आहे. ग्रामीण टॅलेंटला राष्ट्रीय पातळीवर यश मिळण्याबरोबर वडिलांच्या स्वप्न पुर्ण करण्यासाठी संदेशने यशाची पुढची पायरी चढणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केली.

आता ध्येय `आयटीएफ’ असेल

नुकताच मध्यप्रेदशातील अखिल भारतीय राष्ट्रीय लॉन टेनिस स्पर्धेतील यशानंतर पुढे आंतरराष्ट्रीय टेनिस फेडरेशनकडून खेळायचे स्वप्न असल्याचे संदेशने सांगितले. ग्रामीण भागातील खेळाडूंसाठी विविध स्तरावर वैयक्तिक स्पर्धेचे आयोजन झाले तरच आपली क्षमता आणि तयारी ओळखता येते. यामुळे खेळाडूला चांगल्या संधी मिळत असतात.

Related Stories

अव्वल प्रथमश्रेणी क्रिकेटपटू रजत भाटिया निवृत्त

Patil_p

कोल्हापूर : इचलकरंजीच्या गुंड लाखे गँगमधील फरारी गुन्हेगाराला अटक

triratna

कोल्हापूर : सावर्डे- मांगले धरणाजवळ नदीपात्रात 70 वर्षीय महिलेचा आढळला मृतदेह

triratna

कोल्हापूर : सातार्डेच्या आजीबाईंनी दिला महावितरणला आधार

triratna

शहरात २ वेश्या अड्डयांवर छापा, ३ अटक

triratna

कोल्हापूर : गगनबावडा तालुक्यात चार कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची भर

triratna
error: Content is protected !!