तरुण भारत

‘रेमडेसिवीर’चा काळाबाजार आता थांबणार : टोपे

ऑनलाईन टीम / जालना :  

कोरोनावर प्रभावी ठरणाऱ्या ‘रेमडेसिवीर’ इंजेक्शनचा काळाबाजार रोखण्यासाठी राज्यातील ठाकरे सरकारने नवा प्लॅन आखला आहे. त्यानुसार दोन पद्धतीत या इंजेक्शनचे वाटप करण्यात येणार आहे.  

Advertisements

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते जालना येथील खासगी कोविड रुग्णालयांना ‘रेमडेसिवीर’ इंजेक्शनचे वाटप करण्यात आले. त्यानंतर बोलताना टोपे म्हणाले, ‘रेमडेसिवीर’ इंजेक्शनचे उत्पादन करणाऱ्या सात कंपन्यांकडून निविदा पद्धतीने सरकारच्या वतीने हाफकीन कंपनी टेंडर काढून हे इंजेक्शन खरेदी करणार आहे. त्यानंतर सरकारी रुग्णालयांना याचा पुरवठा होईल.  

तसेच प्रत्येक जिह्यात एक स्टॉकिस्ट असणार असून, त्याला या इंजेक्शनचा पुरवठा केला जाणार आहे. जिल्हाधिकारी खासगी रुग्णालयांची इंजेक्शनची गरज लक्षात घेऊन इंजेक्शनचा पुरवठा करतील. या वाटपावर जिल्हाधिकाऱ्यांचे नियंत्रण राहील. त्यामुळे इंजेक्शनचा काळाबाजार होणार नाही आणि तुटवडा निर्माण होणार नाही, असेही टोपे म्हणाले.  

Related Stories

अनिल देशमुख यांच्या राजीनाम्यावर प्रतिक्रिया देताना देवेंद्र फडणवीस म्हणाले…

pradnya p

महाराष्ट्र : 14 लाख 70 हजार 660 रुग्ण कोरोनामुक्त!

pradnya p

शेतमजूराने बनविला डिझेलवर चालणारा नांगर

Shankar_P

शाहूपुरी पोलिसांची 34 दुचाकी चालकांवर कारवाई

Patil_p

रामदास आठवले यांनी राष्ट्रपतींना पत्र लिहून केली ‘ही’ मागणी

pradnya p

कृष्णा योजनेच्या पाईप लाईनला गळती

Shankar_P
error: Content is protected !!