तरुण भारत

”देवेंद्र फडणवीसांचे केंद्रात वजन असेल तर…”

मुंबई / ऑनलाईन टीम

राज्यात कोरोना रूग्णांची वाढती संख्या पाहता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी १५ दिवसांच्या संचारबंदीची घोषणा केलीय. या काळात कठोर निर्बंध लावण्यात आले आहे. यानंतर प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या भाजपने मुख्यमंत्र्यांवर टीका केली आहे. विरोधकांच्या या टीकेला आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

देवेंद्र फडणवीस यांच्या टीकेला प्रत्युत्तर देत नाना पटोले म्हणाले की, देवेंद्र फडणवीसांचे केंद्रात वजन नाही हे मला माहिती आहे. कारण त्यांच्या सगळ्या गोष्टी मला माहिती आहेत. पण त्यांचे जर वजन असेल, तर त्यांनी महाराष्ट्राच्या वाट्याचे केंद्रात अडकलेले ९० हजार कोटी रुपये मिळवून द्यावेत आणि या मुद्द्यावर राजकारण करू नये. राज्य सरकारकडून ते करून घ्यायची जबाबदारी काँग्रेसची असेल. पण यात त्यांनी राजकारण करू नये. मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेल्या लॉकडाऊनचं आम्ही समर्थन करतो आणि पॅकेजसाठी अभिनंदन करतो. पण त्यात काही घटक सुटलेले आहेत. न्हावी, फुल विक्रेते, शेतकरी यांचा त्यात समावेश करावा ही मागणी करणारे पत्र आम्ही मुख्यमंत्र्यांना काँग्रेसकडून देणार असल्याचे यावेळी माध्यमांशी बोलतान नाना पटोले यांनी सांगितले.

नाना पटोले पुढे म्हणले की, घरातील माणसे मरत आहेत आणि विरोधी पक्षाचे नेते मात्र राजकारणात दंग आहे. आम्ही लोकांचे जीव वाचवण्याचं काम करत आहोत. तर विरोधक खुर्चीसाठी राजकारण करत आहेत. मोदी हे प्रचारजीवी आहेत. ते मास्क न घालता प्रचार करत सुटले आहेत आणि लोकांना मास्क घाला म्हणून सांगत आहेत. लोकांचा जीव जातोय. ज्याचं जळतं, त्याला कळतं. अनेक परिवारांमध्ये कोरोनामुळे कर्ते लोकं मरण पावले आहेत. त्यांच्या डोळ्यातले अश्रू आम्ही पाहिले आहेत. त्या अश्रूंवर कुणी राजकारण करू नये, असा आमचा त्यांना सल्ला आहे, असे नाना पटोले यावेळी म्हणाले.
देवेंद्र फडणवीस नेमके काय म्हणाले आहेत?
सरकारने जाहीर केलेली ३ हजार ३०० कोटींची तरतूद ही अर्थसंकल्पातली नियमित तरतूद आहे. त्यामुळए ही कोरोनासाठीची तरतूद नाहीच. त्यामुळे सरकारचे पॅकेज म्हणजे निव्वळ धूळफेक असल्याची टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास अघाडी सरकारवर केली आहे.

Related Stories

गगनबावडा तालुक्यात पावसाच्या हजेरीने शेतकऱ्यांना दिलासा

Shankar_P

हिमाचल प्रदेश : मेडिकल कॉलेजची महिला चिकित्सक चंदीगडमध्ये कोरोना पॉझिटिव्ह

pradnya p

मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर कोरोना पॉझिटिव्ह

pradnya p

मुख्यमंत्री ठाकरे आणि संभाजीराजे यांच्यात बुधवारी`वर्षा’वर बैठक

triratna

सांगली : आंबेगावात कोरोना बाधित रुग्ण, संपूर्ण गाव बंद

triratna

आता नवा वसूली मंत्री कोण?, चित्रा वाघ यांचा सवाल

pradnya p
error: Content is protected !!