तरुण भारत

कोल्हापूर : डॉ. आंबेडकर जयंती उत्साहात

पालकमंत्री सतेज पाटील यांच्या हस्ते बिंदू चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन


प्रतिनिधी / कोल्हापूर

Advertisements

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त कोरोनाच्या नियमांचे पालन करीत बिंदू चौकातील महात्मा जोतिबा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पालकमंत्री सतेज पाटील यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. डॉ. आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी बिंदू चौकात पांढरी कपडे परिधान केलेल्या लोकांची दिवसभर वर्दळ होती.

पालकमंत्री सतेज पाटील म्हणाले, डॉ. आंबेडकर जयंती म्हंटले की सर्वत्र उत्साहाचे वातावरण असते. परंतू कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आंबेडकर प्रेमींनी संयम राखत ऑनलाईन प्रबोधनास पसंदी दिली आहे. तसेच सामाजिक जबाबदारी म्हणून फळवाटप, अन्नदान आणि रक्तदान शिबिराचे आयोजन करीत खऱया आर्थाने डॉ. आंबेडकर यांच्या विचारांना अभिवादन केले आहे. यावेळी जिल्हाधिकारी दौलत देसाई, जिल्हा पोलिस प्रमुख डॉ. शैलेश बलकवडे, महापालिका प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे, आमदार जयंत आसगावकर, आमदार ऋतुराज पाटील, माजी आमदार सुजित मिणचेकर, माजी नगरसेवक अशोक जाधव, कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृती समितीचे अध्यक्ष डॉ. शरद गाकवाड, प्रा. शहाजी कांबळे, उत्तम कांबळे, रूपाली वायदंडे, अनिल धनवडे, अविनाश शिंदे, बाळासाहेब भोसले, डी. जी. भास्कर, विश्वास देशमुख आदी उपस्थित होते.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त शहरातील सिध्दार्थनगर, डॉ. आंबेडकर नगर, राजेंद्रनगर, विचारेमाळ, कदमवाडी परिसरातील बुध्द विहारांमध्ये ठराविक लोकांच्या उपस्थितीत पंचशील -त्रिशरण, बुध्द वंदना घेण्यात आली. डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भीमगीत, मिरवणूका, सार्वजनिक कार्यक्रम रद्द करीत ऑनलाईन व्याख्याने, भिमगीतांचे आयोजन करण्यात आले होते.

व्हॉटसऍप, फेसबुक, इन्स्टाग्रामाच्या माध्यमातून समाजप्रबोधन केले. घराघरात डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमेस अभिवादन करीत गोडाधोड जेवनाचा बेत करण्यात आला होता. काही घरांमध्ये भारतीय राज्यघटनेच्या प्रस्तावनेचे वाचन केले. विविध संस्था संघटनांकडून बिंदू चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा जोतिबा फुले यांच्या पुतळÎाला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. एकंदरीत साध्या पध्दतीने डॉ. आंबेडकर जयंती साजरी करीत शासनाच्या आवाहानाला प्रतिसाद दिला.

निळे झेंडे व पुस्तक खरेदीला चांगला प्रतिसाद

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त बिंदू चौकात निळे झेंडे, डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमा, पुस्तकांचे स्टॉल उभारण्यात आले होते. बिंदू चौकात येणाऱया बहुतांश आंबेडकर प्रेमींनी किमान एक पुस्तक खरेदी करून विक्रेत्याला आर्थिक हातभार लावला. एकंदरीत पुस्तक विक्री व निळÎा झेंडÎांच्या विक्रीला चांगला प्रतिसाद मिळाला.

Related Stories

इचलकरंजीत सोमवारी अर्थसंकल्पावर चर्चासत्र

triratna

कोल्हापूर : सोशल डिस्टन्स पाळत सांगरूळ परिसरात गणरायाचे आगमन

triratna

शिरोळ पंचायत समिती सभापती मिनाज जमादार यांचा राजीनामा

triratna

कोल्हापूर : चित्रपट महामंडळात ‘सवाल जवाब’चा टेलर!

triratna

योग्य प्रश्न विचारणे हेच इतिहासकारांसमोरील खरे आव्हान : प्रा. स्टीवर्ट गॉर्डन

triratna

कोल्हापूर : कोरोनाग्रस्तांच्या अंत्यसंस्काराची रक्कम देण्यास पालिकेकडून टाळाटाळ

triratna
error: Content is protected !!