तरुण भारत

कचऱ्याच्या पिशवीत भरले कोरोना रुग्णाचे पार्थिव; ठाण्यातील प्रकार

ऑनलाईन टीम / मुंबई : 

कोरोना रुग्णाचे पार्थिव चक्क कचऱ्याच्या पॉलिथीन पिशवीत भरल्याची लाजिरवाणी बाब ठाण्यातील एका  रुग्णालयातून समोर आली आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी यासंदर्भातील व्हिडिओ शेअर केला आहे.  

Advertisements

या व्हिडिओमध्ये दिसत आहे की, कोरोना रुग्णांचे चार मृतदेह आहेत. हे मृतदेह गाडीत ठेवण्यात आले आहेत. त्यामधील एक स्ट्रेचरवर आहे. त्याला कचऱ्याच्या काळ्या पॉलिथीन पिशवीत गुंडाळण्यात आले आहे. त्याच्या चेहऱ्यावर पांढरी पिशवी आहे. 

किरीट सोमय्या यांनी या प्रकारानंतर सरकारच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. प्रशासनाकडे पार्थिव पॅक करायला पिशव्या नाहीत. म्हणून कचऱ्याच्या काळ्या पिशवीत चिकटपट्टीने पार्थिव पॅक केले जात आहेत. ही अत्यंत दुर्देवी घटना आहे, असे सोमय्या यांनी म्हटले आहे.

Related Stories

सुप्रिया सुळेंनी ‘या’ कारणासाठी केली पंतप्रधान नरेंद्र मोदींना विनंती

triratna

पोलिसांच्या सौम्य लाठीचार्जनंतर वांद्रे स्टेशनबाहेरील मजुरांची गर्दी ओसरली

prashant_c

मराठा विरुद्ध ओबीसी वाद लावण्याचा प्रयत्न करू नये : खासदार संभाजीराजे

Shankar_P

बनावट नोटा तयार करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश

Shankar_P

शहापूर : एका प्लास्टिक कंपनीला भीषण आग, नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू

pradnya p

मुंबई पोलीस आयुक्त नगराळेंनी घेतली गृहमंत्री अनिल देशमुखांची भेट

triratna
error: Content is protected !!