तरुण भारत

अभिनेते आशुतोष राणा यांना कोरोनाची लागण

ऑनलाईन टीम / मुंबई : 


देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने पसरत आहे. महाराष्ट्रात तर चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यातच बॉलीवूड मधील अनेक कलाकारांना कोरोनाने आपले शिकार बनवले आहे. दरम्यान, अभिनेते आशुतोष राणा यांना देखील आता कोरोनाची बाधा झाली आहे. 

Advertisements


दरम्यान, काही दिवसांपूर्वीच आशुतोष राणा आणि त्यांच्या पत्नी रेणुका शहाणे यांनी कोरोनाचा पाहिला डोस घेतला असल्याची माहिती ट्विट करत दिली होती. 


आशुतोष राणा यांनी माहिती देताना सांगितले होते की, 6 एप्रिल रोजी मी आणि माझी पत्नी रेणुका आम्ही दोघांनीही कोरोनाचा पाहिला डोस घेतला आहे. त्यांचा फोटो देखील मोठ्या प्रमाणत व्हायरल झाला होता. असे असले तरी देखील आशुतोष राणा यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. 


दरम्यान, मागील काही दिवसात अनेक कलाकारांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. यामध्ये अक्षय कुमार, गोविंदा, आमिर खान, आलिया भट्ट, आर. माधवन, भूमी पेडणेकर, विकी कौशल, वरुण धवन, रणबीर कपूर, बप्पी लहरी, परेश रावल आदी कलाकारांचा समावेश आहे. यातील अनेक कलाकारांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात देखील केली आहे. तर अभिनेता संजय दत्त, सलमान खान, कमल हसन, सैफ अली खान, हेमा मालिनी आदी कलाकारांनी कोरोनाची लस देखील टोचून घेतली आहे. 

Related Stories

गायत्री दातार करतेय सामाजिक कार्य

Patil_p

‘लता भगवान करे’चा ट्रेलर प्रदर्शित

prashant_c

कोरोनाविषयक सामाजिक लघुपट सातासमुद्रापार

Patil_p

शिवसेना नाही ‘सोनिया सेना’ : कंगना

pradnya p

या आठवडय़ात

Patil_p

‘तारक मेहता..’मधील ‘या’ अभिनेत्यांना कोरोनाची लागण

pradnya p
error: Content is protected !!