तरुण भारत

सोलापूर शहरात 307 तर ग्रामीणमध्ये 669 नवे कोरोना रुग्ण

प्रतिनिधी / सोलापूर

सोलापूर शहरात आज 307 तर ग्रामीणमध्ये 669 इतक्या रुग्णांची नोंद झाली आहे. मृत्यूच्या संख्येत वाढ झाली असून शहर व ग्रामीण असे एकूण 25 मयत झाले आहेत. तसेच उपचार घेऊन बरे झालेल्या 747 जणांना घरी सोडण्यात आले आहे.

सोलापूर शहरातील 2 हजार 236 जणांचे अहवाल प्राप्त झाले. त्यातील 307 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह तर 1 हजार 928 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले. 307 पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये 171 पुरुष तर 136 स्त्रियांचा समावेश आहे. शहरातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 20 हजार 310 इतकी झाली आहे. सोलापूर जिह्यातील ग्रामीण व नगरपालिका क्षेत्रामध्ये 3 हजार 924 जणांचे अहवाल प्राप्त झाले. त्यातील 669 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह तर 3 हजार 225 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले. 669 पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये 415 पुरुष तर 254 स्त्रियांचा समावेश आहे. जिह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 54 हजार 104 इतकी झाली आहे.

Advertisements

आजपर्यंतची तालुकानिहाय रुग्णसंख्या

अक्कलकोट 1531, बार्शी 10039, करमाळा 4457, माढा 6192, माळशिरस 9587, मंगळवेढा 2442, मोहोळ 2569, उत्तर सोलापूर 1117, पंढरपूर 10322, सांगोला 3865, दक्षिण सोलापूर 1984.

Related Stories

सोन्याचं बाशिंग लगीन देवाचं लागलं …

triratna

कोरोनामुक्त आ. गोपीचंद पडळकरांचे जेसीबीच्या सहाय्याने फुले उधळून स्वागत

triratna

सोलापूर : ग्रामीण विद्यार्थ्यांना महाविद्यालयात ऑनलाईन परीक्षेची सोय

triratna

सोलापूर : तीन जिल्ह्यातून वैराग भागातील दोघे तडीपार

triratna

सोलापूर जिल्ह्यातील 94 टक्के मिळकत पत्रिका झाल्या ऑनलाईन

triratna

सोलापूर ग्रामीणमध्ये एकाच दिवशी 175 रुग्ण कोरोनामुक्त

triratna
error: Content is protected !!