तरुण भारत

भारताचे पाच ऍथलेट्स कोरोना पॉझिटिव्ह

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

बेंगळूरच्या साई क्रीडा केंद्रात टोकियो ऑलिम्पिकमध्ये सहभागी होणाऱया 20 किमी वॉकर प्रियांका गोस्वामीसह ट्रक ऍन्ड फील्डचे पाच ऍथलेट्स कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. याशिवाय साहाय्यक स्टाफमधील एक सदस्यही पॉझिटिव्ह आढळला आहे.

Advertisements

2018 मध्ये आशियाई स्पर्धेत 1500 मी.चे सुवर्ण जिंकणारा जिन्सन जॉन्सन व स्टीपलचेसर चिंता यादव यांचा त्यात समावेश असून रेस वॉकर प्रशिक्षक अलेक्झांडर आत्सिबाशेव्ह यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. टोकियोत सहभागी होणारा आणखी एक रेस वॉकर केटी इरफान मात्र निगेटिव्ह आढळला आहे. जॉन्सनशी त्याचा संपर्क आला असल्याने त्याची चाचणी घेण्यात आली होती. साई केंद्रातील एका सूत्राने सांगितले की, प्रियांका गोस्वामी, यादव व आणखी दोन ऍथलेट्स कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. या सर्वांना साई केंद्रात क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आले आहे.

Related Stories

आशियाई सांघिक टेटे चॅम्पियनशिपमध्ये भारताला कांस्यपदक

Patil_p

टी-20 वर्ल्डकपसाठी अँडी फ्लॉवर अफगाणच्या क्रिकेट सल्लागार

Patil_p

आयपीएल रद्द झाल्यास 3800 कोटींचा फटका

Omkar B

सहाव्या फेरीत विश्वनाथन आनंदचा ड्रॉ

Patil_p

लंकेच्या विजयात चंडीमल, निसांका यांची अर्धशतके

Patil_p

मुंबईच्या प्रशिक्षकपदी अमोल मुजूमदारची निवड

Amit Kulkarni
error: Content is protected !!