तरुण भारत

भाजप नेते आणि आमदार आशिष शेलार यांना कोरोनाची लागण

ऑनलाईन टीम / मुंबई : 


महाराष्ट्रात ‘ब्रेक द चेन’ मधील निर्बंधाची अंबबाजवणी बुधवारी रात्री 8 वाजल्यापासून सुरू झाली आहे. संचारबंदीचे कडक पालन करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांकडून देण्यात आले आहेत. तरी संसर्गाचे प्रमाण काही कमी होताना दिसत नाही आहे. त्यातच आता भाजपचे नेते आणि आमदार आशिष शेलार यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी स्वतः ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे. 

Advertisements

ते आपल्या ट्विटमध्ये म्हणाले की, मी आज कोविड 19 ची तपासणी केली असता, माझी चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. मी औषधोपचार आणि डॉक्टरांचा सल्ला घेत आहे. जे कोणी माझ्या संपर्कात आलेले आहेत, त्या सर्वांनी स्वत:ला वेगळे ठेवावे आणि वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. मी माझ्या कार्यालयामार्फत मुंबईकरांच्या मदतीसाठी उपलब्ध असल्याचेही आशिष शेलारांनी यावेळी सांगितले. 

  • मुंबईत 9,925 नवे रुग्ण


दरम्यान, बुधवारी मुंबईत 9,925 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. तर 54 जणांचा मृत्यू झाला. तर कालच्या दिवसात 9,273 जणांना डिस्चार्ज देखील देण्यात आला. तर 4,44,214 जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर मृतांची एकूण संख्या 12,140 इतकी आहे. सद्य स्थितीत 87 हजार 443 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. सद्य स्थितीत रुग्ण दुपटीचा कालावधी 40 दिवसांचा आहे

Related Stories

स्फोटकांसह अलकायद्याच्या दोन दहशतवाद्यांना अटक

datta jadhav

कोरोनाच्या धास्तीने वटपौणिमा घरात साजरी

Patil_p

..अन् ते अतिक्रमीत शेड काढून घेण्याचा शेड मालकाचा उपनगराध्यक्षांना शब्द

Abhijeet Shinde

लसीकरणात महाराष्ट्राची देशात अव्वल कामगिरी!

Abhijeet Shinde

कोल्हापूर : सायबर चौकात कोरोना बाधित रुग्ण, पती-पत्नी सीपीआरमध्ये दाखल

Abhijeet Shinde

मान्सूनने 12 दिवस आधीच देश व्यापला

datta jadhav
error: Content is protected !!